टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढ्यात गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून, इंग्लिश स्कूल येथे जलतरण तलाव बांधण्याला राज्य शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित इंग्लिश स्कूल येथे अँड.सुजित कदम यांच्या माध्यमातून होणाऱ्या या जलतरण तलावासाठी १ कोटी २० लाख रुपये खर्च येणार असून, राज्य शासन ९० लाख आणि संस्था ३० लाख रुपये खर्च करणार आहे.
क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक साहाय्य करणे या क्रीडा धोरणाच्या शिफारशीनुसार दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण करून खेळाडूंच्या कामगिरीत वाढ करणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यास चालना देणे हे यामागचे उद्दिष्ट्य आहे.
त्यानुसार क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांनी केलेल्या शिफारशीनुसार या प्रस्तावास मान्यता देण्यात आल्याचा शासन निर्णय १३ जून रोजी प्रसिद्ध झाला आहे.
गेल्या ४० वर्षांहून अधिक कालावधीपासून मंगळवेढ्यात जलतरण तलावाची मागणी होत होती. त्यासाठी जागाही पाहण्यात आली होती. मात्र, त्यास मूर्त स्वरूप आता मिळाले आहे.
मंगळवेढ्यात अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय जलतरणपटू निर्माण झाले आहेत. जलतरण तलावाअभावी विहिरीमध्ये पोहून खेळाडूंनी पदके मिळविली. राज्य शासनाच्या या निर्णयाचे खेळाडू, प्रशिक्षकांनी स्वागत केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज