मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, या बातमीनं खळबळ उडाली आहे. आठवीत शिकणाऱ्या एका मुलानं बंदुकीने आपल्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. सोलापूरच्या माढ्यातील आढेगावमध्ये ही घटना घडली आहे.
श्रीधर गणेश नष्टे असं आत्महत्या केलेल्या या 14 वर्षांच्या मुलाचं नाव आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान श्रीधरने नेमकी आत्महत्या का केली? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.
श्रीधरकडे बंदूक कशी आली?
श्रीधर गणेश नष्टे हा माढ्यातील आढेगावचा रहिवासी आहे, तो आठवीच्या वर्गात शिकत होता. त्याने बंदुकीची गोळी डोक्यात झाडून आत्महत्या केली आहे.
त्याचे वडील गणेश नष्टे हे सिमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत. त्यांचीच ही बंदूक आहे. या बंदुकीचं लायन्सस जम्मू काश्मीरचं आहे. त्याने आपल्या वडिलांची बंदूक घेतली.
शांतपणे खुर्चीवर बसला आणि काही कळायच्या आतच स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली. या घटनेनं नष्टे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मात्र त्याने टोकाचं पाऊल का उचलंल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी मुंबईत देखील असाच एक प्रकार घडला आहे. मुंबई पोलीस दलातील एका हवालदाराच्या मुलानं आत्महत्या केली. हर्ष म्हस्के असे या 20 वर्षांच्या तरुणाचं नाव आहे, त्याने आपल्या वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली.
ही घटना मुंबईतील लोअर परेल परिसरातील एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. मात्र हर्ष याने आत्महत्या का केली? याच कारण अद्याप समोर आलेलं नाही.
ही घटना ताजी असतानाच आता सोलापूरमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रीधर गणेश नष्टे या मुलानं आत्महत्या केली आहे, मात्र त्याच्याही आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज