समाधान फुगारे । सोलापूर ग्रामीण भागात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला असून कोरोना सोलापूरकरांची पाठ काय सोडत नाही दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत असून आज सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या शुक्रवारी 710 झाली असून आज 37 नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर उत्तर सोलापूर तिर्हे येथील 73 वर्षीय पुरुषाचा व अक्कलकोट येथील बुधवार पेठेतील 65 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ( Solapur rural corona virus update )
आज ग्रामीण भागातील ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून ) 382 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 37 पॉझिटिव्ह आहेत तर 245 निगेटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 710 झाली आहे.
कोरोनामुळे जिल्ह्यात ग्रामीण भागात 32 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 329 जण घरी परतले आहेत.349 जणांवर उपचार सुरू आहेत.
आज सुभाष नगर , बार्शी सासुरे , ता.बार्शी . नान्नज , ता.उत्तर सोलापूर माडी , ता.उत्तर सोलापूर ति – हे , ता.उत्तर सोलापूर शिंदेवाडी , ता.माळशिरस साठे नगर , मोहोळ , कोरवली , ता.मोहोळ , देवडी , ता.मोहोळ . भवानी पेठ , बार्शी वैराग , ता.बार्शी . गुंगे गल्ली , मंगळवेढा जुनी पेठ , पंढरपूर . बसवेश्वर नगर , इसबावी , पंढरपूर , संत पेठ , पंढरपूर जिजाऊ नगर , पंढरपूर यमाई तुकाई मंदीर जवळ , पंढरपूर . स्वामी विवेकानंद पार्क , अक्कलकोट . बुधवार पेठ , अक्कलकोट , भारत गल्ली , अक्कलकोट मैंदर्गी रोड , अक्कलकोट , करजगी , ता.अक्कलकोट भोसगा , ता.अक्कलकोट असे या भागात नवे रुग्ण आढळून आले आहेत
तालुका निहाय एकूण कोरोनाबाधितांची संख्याः
अक्कलकोट 135 , बार्शी 121 , करमाळा 6 , माढा 18, माळशिरस 7 , मंगळवेढा 3 , मोहोळ 37, उत्तर सोलापूर 86 , पंढरपूर 40 , सांगोला 5, दक्षिण सोलापूर 252. असे एकूण 710 रुग्ण
——————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज