टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. आज सर्वाधिक 107 रुग्णांची भर पडली.त्यामुळे एकूण बाधितांची संख्या आता 817 झाली असून मृतांची संख्या 34 वर पोहचली आहे. आज सर्वाधिक रुग्ण वैराग येथे 22 सापडले आहेत. तर शनिवारी तिऱ्हे येथील 47 वर्षीय महिला आणि बार्शीतील जयशंकर मिल परिसरातील 55 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील ‘या’ भागात सापडले नवे रुग्ण
पंढरपुरातील रजपूत गल्लीत एक आणि अक्कलकोटमधील खोडवे गल्ली, आझाद गल्ली, फत्तेसिंह चौक, मोरे वस्ती, करजगी, सलगर येथे प्रत्येकी एक रुग्ण, संजय नगरात दोन, भारत गल्लीत तीन, पुकाळे प्लॉट चार, नागणहळ्ळी चार रुग्ण आढळले आहेत. बार्शीतील भोसले चौक, मांगाडे चाळ, देसाई प्लॉट, फुले प्लॉट, भवानी पेठ, मनगिरे मळा, उपळाई ठोंगे, भालगाव, नागोबाची वाडी, गाताची वाडी, वाणेवाडी, साकत पिंपरी येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. बारंगुळे प्लॉट, जयशंकर मिलसमोर, व्हनकळस प्लॉट येथे प्रत्येकी दोन रुग्णांची भर पडली आहे.
उत्तर सोलापुरातील कारंबा, तिऱ्हे येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. मोहोळमधील आदर्श चौक, दत्त नगर येथे प्रत्येकी एक, खवणी दोन, सोहाळे, मसले चौधरी, देवडी येथे प्रत्येकी एका रुग्णांची भर पडली आहे.
माळशिरस तालुक्यातील कोंडबावी, अकलूज येथे प्रत्येकी एक तर गुरसाळे येथे दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. माढ्यातील रिधोरे, मोडनिंब येथे प्रत्येकी दोन, भोसरे येथे तीन, चिंचगाव येथे एक रुग्ण कोरोनाबाधित सापडला आहे.
तर दक्षिण सोलापुरातील कासेगाव, तांदुळवाडी, बरुर, कुंभारी, मुळेगाव तांडा, मंद्रूप येथे प्रत्येकी एक, कंदलगावात दोन, बोरामणीत पाच, भंडारकवठ्यात तीन रुग्णांची भर पडली आहे. कसबा पेठेत चार, सुभाष नगरात तीन, वैराग 22, पिंपळगाव ढाळे तीन असे एकूण 107 रुग्णांची भर पडली.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज