टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना आता डोके वर काढू लागला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आज दिलेल्या अहवालानुसार मौलाली गल्ली अक्कलकोट 1 महिला, बागवान गल्ली अक्कलकोट 1 महिला, होटगी दक्षिण सोलापूर 1 पुरुष, नवीन विडी घरकुल 2 (1 महिला ,1 पुरूष) व अश्विनी वैद्यकीय महाविद्यालय कुंभारी 1 पुरुष असे 6 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बाधितांची संख्या 116 इतकी झाली आहे. (Solapur rural corona updated)
आज आलेल्या अहवालामध्ये अकलूज, सोहाळे या दोन गावांशिवाय दक्षिण सोलापूर तालुक्यातील पारधीवस्ती, मुळेगाव तांडा (ता. दक्षिण सोलापूर) येथे एक, वळसंग येथे दोन, नवीन विडी घरकुल येथे एक बाधित रुग्ण आढळून आला आहे. याशिवाय मौलाली गल्ली अक्कलकोट येथेही एक रुग्ण सापडला आहे. वळसंग आणि सुमित्रानगर-अकलूज येथील रुग्ण हे संपर्कामुळे बाधित झाले आहेत. तर पारधीवस्ती-मुळेगाव, नवीन विडी घरकूल, मौलालीगल्ली अक्कलकोट येथील बाधित रुग्ण हे सारीचे आढळून आले आहेत.
आज 81 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 75 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले तर उर्वरीत 6 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.
मयत झालेल्या व्यक्तींची माहिती
1 ) मयत झालेली व्यक्ती मौलाली गल्ली , अक्कलकोट येथील 60 वर्षाचे पुरुष असून त्यांना दि . 10/06/2020 रोजी सकाळी 11.00 वा आश्विनी ग्रामिण वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय , कुंभारी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . उपचारा दरम्यान दि . 11/06/2020 रोजी सकाळी 09.30 वा त्यांचे निधन झाले . त्यांचा कोव्हीड -19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे .
2 ) मयत झालेली व्यक्ती मौलाली गल्ली , अक्कलकोट येथील 43 वर्षाची महीला असून त्यांना दि . 04/06/2020 रोजी यशोधरा हॉस्पीटल , सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . उपचारा दरम्यान दि . 10/06/2020 रोजी दुपारी 02.00 वा त्यांचे निधन झाले . त्यांचा कोव्हीड -19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे .
3 ) मयत झालेली व्यक्ती पारधी वस्ती , मुळेगाव , ता . दक्षिण सोलापूर येथील 71 वर्षाचे पुरुष असून त्यांना दि . 09/06/2020 रोजी दुपारी 03.29 वा श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय , सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . उपचारा दरम्यान दि . 12/06/2020 रोजी सकाळी 11.30 वा त्यांचे निधन झाले . त्यांचा कोव्हीड -19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे .
4 ) मयत झालेली व्यक्ती होटगी , ता.दक्षिण सोलापूर येथील 70 वर्षाचे पुरुष असून त्यांना दि . 10/06/2020 रोजी दुपारी 03.20 वा गंगामाई हॉस्पीटल , सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . उपचारा दरम्यान दि . 11/06/2020 रोजी संध्याकाळी 06.00 वा त्यांचे निधन झाले . त्यांचा कोव्हीड -19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे .
आतापर्यंत 10 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत 34 जण रुग्णालयातून बरे होऊन घरे गेले आहेत. तर 72 बाधित रुग्ण अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज