सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आज 133 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आज केवळ चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर कोरोनामुक्त झाल्याने आज 151 जणांना घरी सोडण्यात आले.
आज केवळ 775 जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 642 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 133 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 30 हजाराच्या उंबरठ्यावर येऊन पोचली आहे. आजअखेर 29 हजार 984 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 889 जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत.
कोरोनाग्रस्त झाल्याने दोन हजार 935 जण अद्यापही वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत.याशिवाय 26 हजार 160 जणांना कोरोना मुक्त झाल्याने घरी सोडले आहे.
आज ‘या’ गावातील चार जणांचा मृत्यू
माळशिरस तालुक्यातील नेवरे येथील 70 वर्षीय पुरुष, सरकोली (ता. पंढरपूर) येथील 65 वर्षाची महिला, करकंब (ता. पंढरपूर) येथील 93 वर्षाचे पुरुष, सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील 65 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज