टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहराबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने चांगलेच बस्थान बसवले असून सोमवारी 151 रुग्णांची भर पडली असून आता एकूण रूग्णसंख्या 4 हजार 94 झाली आहे.
पंढरपुरातील कोर्टी, करमाळ्यातील फंड गल्ली,माढ्यातील लऊळ, बार्शीतील आडवा रस्तालिंबिचिंचोळी (दक्षिण सोलापूर), नान्नज, वडाळा, अक्कलकोटमधील इंदिरा नगरातील येथील प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पंढरपुरातील अनिल नगर, भोसले चौक, गोविंदपुरा, कालिकादेवी मंदिर चौक, काशी कापड गल्ली, खवा बाजार, पंचमुखी मारूती मंदिराजवळ, विवेकविर्धनी शाळेजवळ, उत्पात गल्ली, झेंडे गल्ली, खेड-भोसे, सरकोली येथे प्रत्येकी एक, लक्ष्मी टाकळीत दोन, संत पेठेत तीन, सांगोला रोड दोन, राऊत मळा, इसबावी येथे प्रत्येकी तीन रुग्ण सापडले. सांगोल्यातील कुंभार गल्ली, साळुंखे वस्ती येथे प्रत्येकी एक, परीट गल्लीत चार, महूद दोन रुग्ण आढळले आहेत.
करमाळ्यातील फंड गल्ली, सुमंत नगरात प्रत्येकी एक, कानड गल्लीत पाच, श्रावण नगरात दोन, माढ्यातील कुर्डूत एक, लऊळमध्ये 20 रुग्ण आढळले आहेत. माळशिरसमधील अकलूजमध्ये चार, माळखंबी, वेळापुरात प्रत्येकी एक, नातेपुते येथे दोन, तर मंगळवेढ्यातील डोरले गल्लीत एक, तुकाई नगरात दोन, मोहोळ तालुक्यातील पेनूरमध्ये एक, वडवळमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत. उत्तर सोलापुरातील नान्नज, वडाळा येथे प्रत्येकी एक, दक्षिण सोलापुरातील हत्तरसंग, मंद्रूप येथे प्रत्येकी एक, मुस्तीत दोन रुग्ण आढळले आहेत.
अक्कलकोटमधील सुभाष गल्ली, काझिकणबस, सुलेरजवळगे, तडवळ येथे प्रत्येकी एक, बार्शीतील आडवा रस्ता, आझाद चौक, भोगेश्वरी मंदिराजवळ, दत्त नगर, लातूर रोड, नागणे प्लॉट, स्वयंवर कार्यालयाजवळ, भालगाव, भोयरे, बोरगाव झाडी, चिंचोली, हात्तीज, खामगाव, तांबेवाडी येथे प्रत्येकी एक, वैरागमध्ये 18, आगळगाव आणि झाडबुके मैदान येथे प्रत्येकी चार, उपळाई रोड, टिळक चौक येथे प्रत्येकी तीन, सुभाष नगरात दोन, सोलापूर रोड परिसरात पाच, खानापूर रोड, गवळी गल्ली, लहुजी चौक येथे प्रत्येकी दोन, बेदराई गल्लीत चार रुग्ण सापडले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 11 तालुक्यांमध्ये 30 हजार 47 व्यक्तींची कोरोना टेस्ट झाल्या आहेत.सोमवारी 1 हजार 20 पैकी 151 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 112 प्रलंबित अहवाल प्रतीक्षेत आहेत.सोमवारी ग्रामीण भागात आठ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या आता 120 वर गेली आहे.
आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील 2 हजार 349 रुग्णांची कोरोनावर मात करून घरी परतले असून अद्यापही 1 हजार 625 रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
Solapur rural 151 positives Corona killed eight patients
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज