टीम मंगळवेढा टाईम्स ।
खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदीय अधिवेशनात ऑपरेशन सिंदूर हा केवळ मीडिया तमाशा होता, असे वक्तव्य केल्याचे पडसाद मंगळवेढ्यात उमटले. भाजपच्या वतीने मंगळवेढा शहरात त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला.

दामाजी चौक येथे प्रणिती शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत प्रतिमेला जोडे मारून प्रतिकात्मक प्रतिमा दहन करून तीव्र भावना व्यक्त केल्या.

निषेध आंदोलनात प्रणिती शिंदे मुर्दाबाद, प्रणिती शिंदे शर्म करो, भारत माता की जय, भारतीय सैन्य दलाचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या.
भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव यांनी प्रणिती शिंदे या आपल्या मतदारसंघाच्या खासदार आहेत, याची आज खंत वाटत आहे. ज्या ऑपरेशन सिंदूरला जगाने मान्य केले आहे,

त्याला नाकारणे म्हणजे तमाम देशभक्तांचा, भारतीय सैन्य दलाचा अपमान आहे. ज्यांच्या वडिलांना भगवा दहशतवाद वाटतो, त्याच प्रणिती शिंदे यांनी आज सैन्यांचा अपमान केलेला आहे.

या आंदोलनात भाजप जिल्हा उपाध्यक्ष संतोष मोगले, शहराध्यक्ष नागेश डोंगरे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुनील कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष युवराज कोळी, युवा मोर्चा शहराध्यक्ष सुशांत हजारे उपस्थित होते.

सायंकाळी काँग्रेसकडून त्याच ठिकाणी प्रतिमेवर दुग्धाभिषेक
खासदार प्रणिती शिंदे यांची मंगळवेढा भाजपने प्रतिमा दहन केल्याचे पडसाद मंगळवेढ्यात उमटले. काँग्रेसच्या वतीने प्रणिता शिंदे यांच्या प्रतिमेस सायंकाळी दुग्धाभिषेक घालून त्यांच्या समर्थनार्थ जयजयकाराच्या घोषणा दामाजी चौकात दिल्या गेल्या. संसदेत भाजपची कोंडी केल्याचे समर्थन केले.

खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंदूरबाबत प्रश्न विचारात भाजप सरकारची कोंडी केल्याने मंगळवेढा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार शिंदेंच्या विरुरात घोषणा देत दामाजी चौक दुपारी आंदोलन केले होते.
या आंदोलनाचा निषेध म्हणून काँग्रेसच्या शहर व तालुका पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या समर्थनार्थ तेथेच आंदोलन केले.
या वेळी शहराध्यक्ष अॅड. राहुल घुले म्हणाले, खासदार प्रणिता शिंदे यांनी लोकसभेमध्ये भाजपच्या खोट्या देशप्रेमाचा आणि हिंदुत्वाचा बुरखा फाडला. त्यामुळे भाजपला पोटशूळ खासदार शिंदे यांना बदनाम करण्यासाठी जे आंदोलन केले आहे, त्याचा निषेध म्हणून प्रतिआंदोलन करण्यात येत आहे.
या वेळी जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, मतदारसंघाचे अध्यक्ष मारुती वाकडे, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, रविकिरण कोळेकर, सिद्धेश्वर घसाडे, आयेशा शेख, पंडित पाटील, मुबारक शेख उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










