
मंगळवेढा टाईम्स टीम । कोरोना व सारीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषदेच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.अनेक उपाययोजना करण्यासाठी आणि कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी आज रविवार,दि.५ जुलै रोजी पुन्हा जनता कर्फ्यू करण्याचे ठरेल आहे,असे पत्रक मुख्याधिकारी यांनी काढले आहे. A one-day public curfew in solapur Mohol today
मोहोळ शहरा सह तालुक्यात कोरोना सारीचे आतापर्यंत २३ रुग्ण आढळले आहेत. त्याचा मोठा प्रादुर्भाव शहरात होतो आहे. याची दखल घेत नगरपरिषदेने बुधवारी बैठक घेतली. यात कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतः हून आपली माहिती प्रशासनास कळविली पाहिजे,होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती बाहेर फिरताना आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल तर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतच आपली दुकाने उघडावी, नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील.
नगरपालिका हद्दीत गुटखा , मावा अथवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री पानटपऱ्या सुरू असल्याचे आढळून आल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याच बरोबर शहरात कामानिमित्त येणाऱ्या व्यक्तींनी तोंडाला मास्क लावणे अत्यावश्यक आहे तर सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे. त्याच बरोबर या विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वानुमते रविवार ,दि.५ जुलै रोजी जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे, असे पत्रकात म्हटले आहे.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












