टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत.आज मरवडे गावात एक रुग्ण आढळून आला असून तो पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे त्याला लागण झाली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.तर आज एका दिवशी एकुण 28 जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षातुन उपचाराअंती सोडणेत आलेले आहे.
आज दि.31 जुलै रोजी 20 जणांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत.तसेच आज 31 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.वरील 31 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी 1 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह 30 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
एक पॉझिटिव्ह रुग्ण हा मरवडे या गावातील असुन यापुर्वीचे पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहे.
मंगळवेढा तालुक्यात आज अखेरपर्यंत 113
रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 52 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आज पर्यंत 60 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज