मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना विषाणू संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये अद्यापही एकही रुग्ण कोरोना बाधित आढळला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
परदेशातून आलेल्या प्रवाश्यांची तपासणी, होम क्वारंटाइन आदी उपाययोजना होत आहे. पथकांकडून प्रवाश्यांशी संपर्क व पाठपुरावा केला जातोय. अद्यापपर्यंत जिल्ह्यात एकही व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह तपासणीत आढळून आला नाही.
परदेशातून, तसेच मुंबई- पुणे येथून आलेल्या नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. बाहेरून परतलेल्या नागरिकांनी, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:हून माहिती देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे संचारबंदीच्या काळात नागरिकांनी काही दिवस विनाकारण घराबाहेर फिरू नये.
दरम्यान होम क्वारंटाईन्ड 141 व इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन्ड 74 व्यक्ती आहेत.काल तीन व्यक्ती दाखल झाले असून त्यांचा रिपोर्ट येणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापुरात आत्तापर्यंत पंचेचाळीस रुग्ण आयसोलेशन वॉर्डात दाखल होते.यातील 39 जणांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे.अद्याप सहा जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे अशी माहितीही शंभरकर यांनी दिली.सोलापुरात अत्यावश्यक वस्तूंचा मुबलक साठा आहे. लोकांनी दुकानांसमोर गर्दी करू नये आणि गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडावे.आज पासून सोलापुरात शिव भोजन योजनेत पाच रुपयात जेवण मिळणे सुरु.
लॉकडाउन मुळे बंद झालेल्या उद्योग-व्यवसायातील कामगारांसाठी निवारा अन्नपाणी, वैद्यकीय देखभाल सुविधा यंत्रणा सज्ज .जिल्हास्तरावर सनियंत्रण समिती स्थापन.सोलापुरात मेडिकल कॉलेजमध्ये सुरू झाली आता कोरोना चाचणी. अवघ्या आठ तासात रिपोर्ट मिळणार.
सोलापूर शहर पोलिसांनी तसेच ग्रामीण पोलिसांनी आजही संचारबंदी काळात फिरणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत मॉर्निंग वॉकला जाऊ नका अशी वारंवार विनंती प्रशासन करत असूनही अनेक लोक सकाळच्या वेळी बाहेर पडतात त्यांवर आता प्राधान्यानं कारवाई सुरू आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज