टीम मंगळवेढा टाईम्स ।
३ ते ७ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाची हवामान विभागाने शक्यता वर्तविली आहे. म्हणजेच या काळात सोलापुरातील काही भागात भाग बदलत जोरदार पाऊस पडणार आहे.
सर्वत्र पडणार नाही मात्र भाग बदलत जोरदार पाऊस पडणार आहे. सोलापूर शहर व जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ७ ऑक्टोबरपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
सध्या सोलापूरच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ऑक्टोबर हीटचा जास्त तडाखा सोलापूरकरांना बसत आहे.
दिवसभर कडक उन्ह अन् रात्री नऊ, दहानंतर जोरदार पाऊस पडत असल्याचे चित्र मागील आठवड्यांपासून दिसत आहे.
७ ऑक्टोबरपर्यंत सोलापूर शहर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, करमाळा, अक्कलकोट, सांगोला, मंगळवेढा, माढा, मोहोळ, माळशिरस आदी भागात भाग बदलत जोराचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबर हीटचा तडाका पहायला मिळत आहे. ऑक्टोबर हीटमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.
शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याची गरज
■ ज्या ठिकाणी भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तेथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीपिकांची काळजी घेणे अपेक्षित आहे.
■ काढणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवणे आवश्यक आहे. सोलापुरात रात्रीच्या वेळेस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज