टीम मंगळवेढा टाईम्स ।
उपजिल्हाधिकारी असल्याचे भासवून अनेक तरुणांना नोकरीचे बोगस नियुक्ती पत्र देत, सोलापूर शहरात मागील सहा महिन्यांपासून उपजिल्हाधिकारी म्हणून वावरत, जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीस लावतो म्हणून नोकरीचे आमिष दाखवून तिघा तरुणांना ४० लाखाला गंडविणाऱ्या आरोपीस पोलिसांनी सापळा लावून गुरुवार ताब्यात घेतले आहे.
विठ्ठल गुंडेराव वाघमोडे यांनी फिर्यादी दिली आहे. याप्रकरणी आरोपी पवन मारुती पांढरे (रा. कासार शिरसी, तालुका निलंगा, जि. लातूर) याच्याविरुद्ध उत्तर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक महिती अशी की, आरोपी याने मागील दीड वर्षापासून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी पदावर असल्याचे सांगत अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडवत होता. तशा स्वरूपाचे ओळखपत्र, कागदपत्रे स्वतःजवळ बाळगून नोकरी लावतो म्हणून लाखो रुपये उकळत होता.
निवासी जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या सहीची खोटी कागदपत्रे बनवून नोकरीचे आमिष दाखवून फिर्यादी व इतर दोघा नातेवाइकाकडून एकूण ४० लाख रुपये लुटले.
त्यांना खोटे नियुक्त पत्र देऊन फिर्यादीची फसवणूक केली आहे. ही घटना सप्टेंबर-२०२३ ते ३ ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी अक्कलकोट सोलापूर व लातूर येथे घडली आहे. अधिक तपास अंमलदार पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग पवार करीत आहेत.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार, पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे, सपोनि नीलेश बागाव यांच्या मार्गदर्शनाखाली
डी. बी. पथकातील पोसई पांडुरंग पवार, पोहेकाँ महादेव चिंचोळकर, पोकाँ प्रमोद शिंपाळे, पोकाँ शिवलिंग स्वामी, पोकाँ महादेव शिंदे, पोकाँ श्रीकांत जवळगी, पोकाँ केदार सुतार यांनी केली आहे.
ओळखपत्र जप्त
या घटनेतील आरोपीकडून ७ लाख रुपये रोख रक्कम यासह बनावट सही, शिक्का, नियुक्तीपत्र, अशोकस्तंभ असलेले भारत सरकार कार्मिक एवं प्रशिक्षण विभाग असे नाव असलेले ओळखपत्र पोलिसांनी जप्त केली आहे.
आरोपीला कोर्ट शेख यांच्यासमोर उभे केले असता त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकील म्हणून सरवदे यांनी काम पाहिले.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज