कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे नागरिक मास्क वापरत नाहीत त्यांच्यावर यापुढे ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करा, असे सुधारित आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत.
यापूर्वी मास्क न वापरणाऱ्यावर शंभर रुपयाची दंडात्मक कारवाई सुरू होती. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोर करा असे सांगत दि.२४ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद तसेच इतर विभागातील अधिकाऱ्यांना मास्क वापरण्यासंदर्भात नवीन आदेश दिले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यावर यापूर्वी सोलापूर महानगरपालिका तसेच पोलीस आयुक्त कार्यालयाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्या. मोठी दंडात्मक रक्कम देखील वसूल झाली.
पण आता दंडाच्या रकमेत पाचपट वाढ झाल्याने दंड वसूल रकमेत आणखीन मोठी वाढ होईल. दंडात मोठी वाढ झाल्याने मास्क न वापरणाऱ्यांची संख्या देखील घटेल
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज