मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । मंगळवेढा शहरातील गुंगे गल्ली येथे एक कोरोना बाधित रुग्ण आढळुन आल्याने शहरातील गुंगे गल्ली, मंगळवेढा नगरपरिषद हद्द परिसर, शहरालगत ग्रामीण परिसर आणि शहरातील श्री संत दामाजी नगर ग्रामपंचायत परिसर व संत चोखामेळानगर ग्रामपंचायत हद्द परिसर व त्याच्या आजूबाजूच्या तीन किलोमीटर क्षेत्रापर्यतच्या सर्व बंद करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली. A corona-infected patient was found in the city of mangalwedha; Municipal administration alert
शहरात तो भाग सील केल्यानंतर नगरपालिका प्रशासनाकडून त्या भागातील सर्व ठिकाणी फवारणी करण्यात आली आहे.
मंगळवेढा ग्रामीण भागात बोराळे गावात पहिला रुग्ण आढळून आला त्यानंतर दुसऱ्या दिवशीच शहरात गुंगे गल्ली येथे कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व संसर्ग रोखण्यासाठी त्यावर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
शहरातील गुंगे गल्ली, मंगळवेढा नगरपरिषद हद्द परिसर, शहरालगत ग्रामीण परिसर आणि शहरातील श्री संत दामाजी नगर ग्रामपंचायत परिसर व संत चोखामेळानगर ग्रामपंचायत हद्द परिसर व त्याच्या आजूबाजूच्या एक किलोमीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे तर या परिसराच्या तीन किलोमीटर अंतरापर्यंतचा परिसर बफर झोन म्हणून उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी जाहीर केला आहे.
पुढील आदेश येईपर्यंत ‘ही’ दुकाने राहणार बंद
मंगळवेढा शहरासह परिसरातील श्री संत दामाजी नगर व श्री संत चोखामेळा नगर ग्रामपंचायत परिसरातील अत्यावश्यक सुविधा फक्त सुरू राहणार आहेत.यामध्येही हॉस्पिटल व मेडिकल हे फक्त दोनच सेवा सध्या तरी सुरू आहेत.बाकीचे सर्व दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवली असून पुढील आदेश येई पर्यंत ही दुकाने बंद राहणार आहेत.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज