बाळासाहेब झिंजुरटे। कोरोनाचा प्रवेश सोलापुरात होऊन आज बरोबर तीन महिने पूर्ण होत असतानाच शनिवारी शहरात 86 नव्या रुग्णांची भर पडली आहे. शहरातील दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शहरातील 234 तर ग्रामीणमधील 56 जणांचे अहवाल प्रलंबित असल्याने आता आज किती रुग्णांची भर पडणार याची चिंता सोलापुरकरांना लागली आहे.
शनिवारी सेटलमेंट कॉलनी क्र. सहा, मल्लिकार्जुन नगर, जुनी मिल चाळ, लक्ष्मी पेठ, अभिषेक नगर, बनशंकरी नगर, सिध्देश्वर नगर (मजरेवाडी), वृदांवन सोसायटी, ओम नम: शिवाय नगर, गोंधळे वस्ती, रेल्वे लाईन, गिता नगर (न्यू पाच्छा पेठ), कलावती नगर, भूलक्ष्मी नगर (एमआयडीसी), आंबेडकर सोसायटी (कुमठा नाका), रविवार पेठ, अभिमान श्री कॉम्प्लेक्स, टिळक चौक, शेळगी, जवाहर सोसायटी, कुमठा नाका (स्वागत नगर), शिवाजी नगर (मोदी), बसवेश्वर नगर, आत्मविश्वास नगर, मंगळवार बाजार, एन जी मिल चाळ, आदर्श नगर, खडक गल्ली (बाळे), साईबाबा चौक, अवंती नगर, वरद फार्म ,अभिषेक नगरात सहा, उत्तर कसब्यात दोन, होटगी रोडवर दोन,
न्यू पाच्छा पेठेत तीन, बुधवार पेठेत तीन, रामलाल नगरात दोन, कुमठ्यात चार, लक्ष्मी नगर, राहूल नगर (हत्तुरे वस्ती) प्रत्येकी दोन,
भवानी पेठ (मराठा वस्ती) येथे चार, कोंडा नगर (अक्कलकोट रोड) येथे दोन, सेटलमेंट कॉलनी क्र.एक येथे तीन, शहा नगर (लिमयेवाडी) दोन, जोडभाव पेठेत चार, मल्लिकार्जुन नगरात पाच, चिंता नगरात (निराळे वस्ती) तीन रुग्णांची भर पडली आहे.याठिकाणी शनिवारी नव्या रुग्णांची भर पडली आहे.
86 patients in the city of Solapur; Anxiety raised by pending 290 report
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज