टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूरात मंगळवारी आणखीन एकाने गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. गेल्या 12 तासामधील सोलापूर शहरातील ही पाचवी आत्महत्येची घटना आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्यापूर्वी सिद्धेश्वर वनविहार येथे बाभळीच्या झाडाला एक व्यक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. Solapur city Another died of strangulation
मंगळवारी सकाळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विजापूर रोडवरील सिध्देश्वर वनविहारामध्ये एक व्यक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. राजेश निकम, वय वर्ष 48, असे या व्यक्तीचे नाव आहे. सदर व्यक्ती ही घर नं २८० , सुशिल नगर डी.टी.एड. कॉलेज जवळ, विजापूर रोड सोलापूर या ठिकाणी राहत होती. राजेश निकम हे रिक्षा चालक असून कंत्राट पध्दतीने दुस-याची रिक्षा चालवित असत. निकम यांच्या पश्चात पत्नी सविता निकम, मुलगा सागर निकम, मुलगी श्रद्धा निकम, आई सुशिला निकम आहेत. परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मंगळवारी सकाळी बाबळीच्या झाडास गळफास घेतलेल्या बेशुद्धावस्थेत निकम हे आढळून आले. विजापूर नाका पोलीस स्टेशनचे हवलदार डी एम गंभीरे यांनी त्यास सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेण्यात आले, परंतु सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. विजापूर नाका पोलीस स्टेशनचे डी.एम. गंभीरे हे पुढील तपास करत आहेत.
सोमवारी सावकारी जाचापोटी आणि आर्थिक अडचणीमुळे हांडे प्लॉट येथील एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केली होती. त्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती आणि मंगळवारी सकाळी विजापूर रोडवरील सिद्धेश्वर वन विहारात झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने सोलापूरात खळबळ माजली आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज