mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सावधान! सोलापूर जिल्ह्यात बनावट कागदपत्राव्दारे सिमकार्ड तयार करून बेकायदेशीर विक्री

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 25, 2020
in सोलापूर, क्राईम

टीम मंगळवेढा टाईम्स ।

दुकानात सीमकार्ड खरेदी करण्यासाठी येणार्‍या ग्राहकांची कागदपत्रे स्कॅन करून, त्याच्याच नावावर घेतलेले नवीन सीमकार्ड अवैध धंदेवाल्यांना बेकायदेशीररीत्या विकणार्‍या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

याप्रकरणी दुकानदारासह 6 जणांना गजाआड केले असून, 13 मोबाईल व 12 कार्डही जप्त केली आहेत.गोपाल मुंदडा (रा. बलिदान चौक) असे दुकानदाराचे नाव आहे. राजेंद्र नागनाथ मल्लूरे (वय 37, रा. भवानी पेठ, घोंगडे वस्ती), स्वामी दुर्गा वरगंटी (रा. भवानी पेठ, वैद्यवाडी), कमलकिशोर नंदकिशोर अट्टल (38, रा. गुरुदत्त चौक, घोंगडे वस्ती), नागेश सुभाष येळमेली (32, रा.शाहीर वस्ती, भवानी पेठ), महांतय्या गुरय्या स्वामी (32, रा. जंगम वस्ती, अक्कलकोट रोड), अशी सीमकार्ड खरेदी करणार्‍यांची नावे आहेत.

शहरात अवैध धंदे करणार्‍यांना दुसर्‍याच्या नावे असलेले सिमकार्ड विक्री होत असल्याच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या होत्या. जोडभावी पोलिस ठाण्यात या प्रकाराबाबत गुन्हाही दाखल झाला होता.

त्याअनुषंगाने पोलिसांनी येथील बलिदान चौकातील गोपाल मुंदडा याचे खाऊघर जनरल स्टोअर्सवर छापा टाकला. दुकानाचा मालक मुंदडा हा सिमकार्ड खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांचा रहिवासी दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड अशी कागदपत्रे तीन ते चारवेळा स्कॅन करून घेत होता.

त्याशिवाय एकाच ग्राहकाचे दोन ते तीन वेळा आपल्या मोबाईलवर फोटो काढून घेत होता. त्यानंतर ग्राहकास सिमकार्ड कार्यान्वित करून देत होता. ग्राहक गेल्यानंतर त्यांच्याकडून घेतलेल्या कागदपत्रांच्या व जास्त काढून घेतलेल्या फोटोआधारे तो अवैध धंदे करणार्‍यांना 400 ते 500 रूपयांना दुसर्‍यांच्या नावावरचे सिमकार्ड विकत असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले.

पोलिसांनी संशयित आरोपींकडून 13 मोबाईल व 12 सिमकार्ड र् असे 75 हजार रूपयांचे साहित्य जप्त केले आहे.ही कामगिरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलिस आयुक्त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे, फौजदार बायस, होटकर, हवालदार कुलकर्णी, पोलिस नाईक सचिन गायकवाड, संतोष येळे, बाबू मंगरूळे, पोलिस कॉन्स्टेबल शेख, गायकवाड, कानडे, माने व पथकाने पार पाडली.

अशी ग्राहकांची फसवणूक

सीमकार्ड खरेदी करण्यासाठी ग्राहक आला असता ओळखपत्र व रहिवासी पुराव्याची कागदपत्रे विशिष्ट मोबाईलमध्ये स्कॅन करून घेतली जात असत.

ग्राहक गेल्यानंतर त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून विविध कंपन्यांचे सीमकार्ड चालू करून घेतले जायचे. ती सुरू झालेली सीमकार्ड अवैध धंदे करणार्‍यांना जास्तीचे पैसे घेऊन विकली जात होती. गेल्या अनेक वर्षांपासून हा बनावटगिरीचा व्यवसाय सुरू होता.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

बहिणीची दादागिरी! सोन्याच्या दुकानात पूर्ण भागीदारीसाठी भावाला धमकी; ज्वेलर्ससमोर गोंधळ घालणाऱ्या बहिणीवर गुन्हा

July 15, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

खुनाचा प्रयत्न प्रकरणातून आरोपीची मुक्तता; मंगळवेढ्यात ॲड.ओंकार भुसे यांच्या न्यायालयीन कौशल्याची चर्चा

July 14, 2026

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

July 14, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

मंगळवेढ्यात बुलेट राजांना दणका! पोलिसांची धडक कारवाई; मॉडिफाईड सायलेन्सर अन् विना नंबर प्लेटच्या ‘या’ वाहनांवर ‘ॲक्शन’

July 10, 2026
Next Post
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

सोलापूर ब्रेकिंग! 'या' तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहिणीं’ची प्रतीक्षा वाढली! जूनचा हप्ता जमा न झाल्याने महिलांची बँकेत चकरा; कधी मिळणार पैसे? लगेच करा ‘हे’ काम; अन्यथा हप्ता अडकू शकतो

July 15, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

बहिणीची दादागिरी! सोन्याच्या दुकानात पूर्ण भागीदारीसाठी भावाला धमकी; ज्वेलर्ससमोर गोंधळ घालणाऱ्या बहिणीवर गुन्हा

July 15, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

खुनाचा प्रयत्न प्रकरणातून आरोपीची मुक्तता; मंगळवेढ्यात ॲड.ओंकार भुसे यांच्या न्यायालयीन कौशल्याची चर्चा

July 14, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

शेतकऱ्यांना दिलासा द्या, उजनी धरणातून पाणी सोडा; मंगळवेढ्यातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

July 15, 2026

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

July 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा