mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर कोरोना ब्रेकिंग! शनिवारी 153 जण कोरोना पॉझिटिव्ह; ‘या’ गावातील 10 जणांचा मृत्यू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 24, 2020
in सोलापूर
सोलापूर कोरोना ब्रेकिंग! शनिवारी 153 जण कोरोना पॉझिटिव्ह; ‘या’ गावातील 10 जणांचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज 125 नवे कोरोना  रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज कोरोनामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.दिलासादायक म्हणजे कोरोनामुक्त झाल्याने आज 192 जणांना घरी सोडण्यात आले.

दरम्यान आज शहर व ग्रामीण भागात मिळून 153 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

आज 1 हजार 717 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 592 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 125 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये 75 पुरुष तर 50 महिलांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधितांची संख्या आता 29 हजार 744 एवढी झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 878 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

कोरोनामुक्त झाल्याने ग्रामीण भागातील 25 हजार 825 जणांना आपापल्या घरी सोडण्यात आले आहे तर अद्यापही वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये तीन हजार 41 जण उपचार घेत आहेत.

आज ‘या’ गावातील नऊ जणांचा मृत्यू

मंगळवेढा घाटोळ वस्ती दामाजी नगर येथील 70 वर्षाची महिला,तालुक्यातील बोराळे येथील 44 वर्षाचे पुरुष,पिलीव (ता. माळशिरस) येथील 70 वर्षाचे पुरुष, खेडभोसे (ता. पंढरपूर) येथील 51 वर्षाची महिला, लिंकरोड पंढरपूर येथील 77 वर्षाचे पुरुष,  चिचुंबे (ता. पंढरपूर) येथील 70 वर्षाचे पुरुष,

तर सांगोला शहरातील शनी गल्ली येथील 50 वर्षाचे पुरुष, सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील 65 वर्षाची महिला तर गादेगाव (ता. पंढरपूर) येथील 27 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुकानिहाय बाधितांची संख्या कंसात मृत्यू

मंगळवेढा- 1371 (35),सांगोला- 2371 (36), पंढरपूर- 5856 (162),दक्षिण सोलापूर- 1406 (44),मोहोळ- 1375 (75),अक्कलकोट- 1071 (67), बार्शी- 5352 (175), करमाळा- 2008 (46), माढा- 3053 (102), माळशिरस- 5162 (102),   उत्तर सोलापूर- 719 (34) = एकूण- 29744 (878)

सोलापूर शहरात आज 28 जण पॉझिटिव्ह

सोलापूर शहरातील 331 संशयितांमध्ये 20 पुरुषांचा आणि 8 महिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर सुरवसे नगरातील 84 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात रुग्णांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी केलेल्या ठोस उपाययोजनांमुळे ते शक्‍य होऊ लागल्याचे चित्र आहे.

मराठा वस्ती, टिळक चौक (उत्तर कसबा), देगाव नाका, नई जिंदगी, देगाव, कमलसिध्द अपार्टमेंट, आर्यनंदी नगर (वसंत विहार), बंजारा सोसायटी (विजयपूर रोड), पाटील नगर (सैफूल), जुना विडी घरकूल, साहिल नगर, टिळक नगर (मजरेवाडी), पदमांजली अपार्टमेंट (मोदी खाना), गुरुनानक नगर, सलगर वस्ती, न्यू पाच्छा पेठ, गोकूळ नगर (जुळे सोलापूर) आणि मंत्री चंडक नगर (रूपाभवानी मंदिराजवळ) आज नव्या रुग्णांची भर पडली आहे.

आतापर्यंत शहरातील पाच हजार 535 पुरुषांना तर तीन हजार 859 महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील चार हजार 870 पुरुषांनी तर तीन हजार 464 महिलांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील 92 संशयित व्यक्‍ती होम क्‍वारंटाईनमध्ये आहेत. तर अवघ्या 60 संशयितांना इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: 153 जण पॉझिटिव्हसोलापूर कोरोना

संबंधित बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
Next Post

खळबळ! सेवानिवृत्त महिला पोलिस निरीक्षक महिला पोलिस उपनिरक्षकाला चावली; पंढरपुरात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा