टीम मंगळवेढा टाईम्स ।
सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंडे यांनी ट्वीट करुन याबद्दलची माहिती दिली आहे.
याआधी गेल्या वर्षी जूनमध्ये मुंडे यांची कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
कोरोनावर मात करून ते राजकारणात सक्रियदेखील झाले होते.माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी positive आली आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती.मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही.सर्वांनी मास्क वापरावा,सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 23, 2021
गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती.
मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी’, असं धनंजय मुंडेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज