मंगळवेढा टाईम्स न्युज ।
मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी या गावामध्ये काल रात्रीपासून बिबट्या सदृश्य प्राण्याने दहशत माजवली असून त्यामुळे गावकरी व शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याचे दिसत आहे. तामदर्डी येथील शेतकरी नागनाथ पुजारी व राजकुमार गावडे हे शेतात रविवार दिनांक 6 रोजी सायंकाळी मोटर चालू करून पाणी लावण्यासाठी गेल्यानंतर त्यांना समोरच बिबट्या सदृश्य प्राणी दिसला.
त्यानंतर येथीलच शेतकरी वासुदेव गावडे, सिध्दाराम काळे, दयानंद पुजारी,गणेश कोडग यांच्याही निदर्शनास हा बिबट्यासदृश्य प्राणी आला होता. त्यानंतर पुन्हा सोमवार दिनांक 7 रोजी सकाळी 6 वाजता माजी सरपंच ज्ञानेश्वर पुजारी यांचे चिरंजीव दयानंद पुजारी हे शेतात कामासाठी गेल्यानंतर यांच्याही नजरेस हा बिबट्या नजरेस पडला.
ग्रामीण भागात रात्रीचे नव्हे तर दिवसाही शेतामध्ये जाणे झाले कठीण झाले असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. पूर्वीच्या काळी काही भागात रात्री शेतामध्ये गेल्यानंतर बिबट्याचे दर्शन घडायचे पण चक्क आता दिवसाही बिबट्या दिसू लागला असल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्यांकडून पाळीव प्राण्यांचा फडशा
मागील अनेक दिवसांपासून राज्यातील विविध भागात बिबट्याने शेतकऱ्यांच्या शेळ्या, कुत्री आणि पाळीव जनावरे यांच्यावर हल्ला करून ठार केले आहेत
तसेच पाळीव प्राण्यांवरील बिबट्याचे हल्ले सुरूच आहे. त्यातच आता माणसांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडू लागल्या आहेत.
मागील काही महिन्यांमध्ये बिबट्यांचे माणसांवर होणारे हल्ले वाढतच आहे. विशेष म्हणजे सध्या बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी नागरीकांना बिबट्याच्या दहशतीखाली घराबाहेर पडावे लागते.
शहरातील नागरिक गावाकडे येण्यास घाबरतात
ग्रामीण भागातील बहुतेक लोक व्यवसाय कामानिमित्त शहरी भागात वास्तव्यात आहेत. सणानिमित्त ते गावाला येत असतात. परंतु, सद्य परिस्थिती पाहता या भागातील नागरीक बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याने आपली लहान मुले घेऊन गावाकडे येण्यास घाबरत आहे. यावर वन विभागाने ठोस पावले उचलून बिबट्या हवा की माणूस हवा ? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
उसामुळे बिबट्यांचा अधिवास वाढला
शेतीपासून पैसे मिळावे म्हणून ऊस क्षेत्राकडे या भागातील शेतकरी वर्ग वळाला आहे. ऊसाला हमीभाव असल्यामुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. उसाच्या बागायती क्षेत्रामुळे बिबट्यांचा वावर या भागात झाला असावा असा अंदाज आहे.तामदर्डी भागात ऊसाचे क्षेत्र जास्त प्रमाणात असल्याने बिबट्यांना लपनक्षेत्र असल्यामुळे बिबट्या वास्तव्यास असल्याचे दिसून येत आहे.
वनविभागाने त्वरीत बिबट्यांचा बंदोबस्त करून शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी नागरीकांकडून जोर धरू लागली आहे. गावातील काही सुज्ञ लोकांनी मंगळवेढा वन विभागाला कळविल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी तात्काळ तामदर्डी गावाला भेट दिली आहे.
यामध्ये वन परिमंडळ अधिकारी महेश मेरगेवाड, वनरक्षक पूजा खेणे, वनसेवक मासाळ, कांबळे, बनसोडे, पोकळे, राऊत, बुरुंगले व माळी इत्यादींनी येऊन शेतामध्ये ठसे तपासले.
परंतु तसे ठसे त्यांना मिळून आले नाहीत. आज संध्याकाळी ही वन खात्याची टीम परत या गावी येऊन तपासणी करणार असल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले. या भागातील शेतकरी व ग्रामस्थांनी सावध राहण्याचेही आवाहन या वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज