मंगळवेढा टाईम्स न्युज ।
मंगळवेढ्याचे हाजी बादशाह शेख हे तालुक्यातील कर्तृत्व म्हणून गणले गेलेले असून त्यांच्या त्यांना शंभराव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व अभिष्टचिंतन करण्यासाठी आपण सर्वजण सभोवतालच्या तालुक्यातील तसेच त्यांचे आप्तेष्ट गणगोत्र त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने आल्याचे मत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले.
हाजी बादशाह अमीर शेख यांचा शंभरावा वाढदिवस व अभिष्टचिंतन सोहळा मंगळवेढा येथे जोगेश्वरी मंगल कार्यालय बायपास रोड मंगळवेढा येथे आयोजित केला होता. याप्रसंगी ते बोलत होते.

प्रशांत परिचारक म्हणाले, खरं तर आपणच भाग्यवान आहोत. त्यांनी आज शंभर गाठलेले असून ही त्यांची पूर्व पुण्याई त्यांच्या वाट्याला आल्यानेच तसेच त्यांच्या आई-वडिलांचे संस्कार व आशीर्वाद यांच्यामुळे त्यांनी आयुष्यभर सत मार्गाचा अवलंब केला, त्यांचे संस्कार आज त्यांच्या मुलांना नातवंडांना व परतवंडांना मिळालेले असून शेख कुटुंबीय आज सर्वच क्षेत्रात अग्रक्रमी असल्याचे त्यांनी त्यावेळेला भावना व्यक्त केल्या.

शेख गुरुजी यांनी आयुष्यभर सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन राहिल्यानेच आज या कार्यक्रमासाठी सर्व स्तरातील व सर्व जाती-धर्माचे लोक उपस्थित असल्याने हा अभिष्टचिंतनाचा सोहळा एक आदर्श व कर्तृत्वान व्यक्तीचा असल्याचे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

व्यासपीठावर नगराध्यक्षा सुनंदा आवताडे, माजी मंत्री प्रा.डॉ. लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार अॅड. धनाजीराव साठे, ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे, धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा. शिवाजीराव काळुंगे, रतलचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, आवताडे शुगर्सचे संजय आवताडे, दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील,

व्हाईस चेअरमन तानाजी खरात, माजी सभापती नंदकुमार पवार, माजी न.पा. पक्षनेते अजित जगताप, नगरसेविका सीमा बुरजे, सतीश मुळे, अविनाश शिंदे, अॅड. सुमैय्या तांबोळी, अब्दुलगफूर शेख, हाजीअजीम शेख, रशीद शेख, युनूस शेख, बशीर शेख, असिफ शेख तसेच सर्व आप्तेष्ट व्यासपीठावर बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रा.डॉ. लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की, शेख गुरुजींनी आयुष्यामध्ये उपेक्षित माणसाच्या कल्याणासाठी काम केलेले असून इंग्रज काळापासून संस्थान काळात तसेच स्वातंत्र्यानंतर लोकशाही शासनामध्ये त्यांनी सचोटीने व प्रामाणिक काम केल्यानेच तालुक्यातील ज्येष्ठ मार्गदर्शक दर्शकांच्या मध्ये गुरुजींचे नाव घेतले जात आहे.

प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी, गुरुजी हे आपल्या कुटुंबाबरोबरच आमच्या सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व्यापार या सर्व क्षेत्रांमध्ये आमचे मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्ष सुनंदा आवताडे म्हणाल्या की, शेख गुरुजींच्या जीवनामध्ये खूप चांगले काम त्यांनी केलेले असून यापुढेही त्यांना दीर्घायुष्य लाभून त्यांच्या हातून असे चांगले सत्कार्य घडावे, अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी अॅड. रमेश जोशी यांनी, त्यांच्या विद्यार्थी दशेतील गुरुजींनी शिकवलेले धडे व पाढे आजही पाठ असल्याचे बोलून दाखवले.

आप्पासाहेब चोपडे म्हणाले, आजचा हा शंभरावा अभिष्टचिंतन सोहळा तालुक्यातील पहिलाच असून आपण सर्वजण भाग्यवान आहोत असे ते म्हणाले.
यावेळी जेष्ठ नेते धनाजी साठे यांनी शेख गुरुजी हे कर्तृत्ववान व शिक्षण व कुटुंब प्रेमी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भीमराव मोरे, आलिशा लतीफ तांबोळी, अमन शेख यांनीही शेख गुरुजींच्या जीवनातील आठवणी सांगितल्या.
या कार्यक्रमास मंगळवेढा तालुक्यासह तसेच पंढरपूर, मोहोळ, सांगोला, सोलापूर, अकलूज, इंदापूर, पुणे इत्यादी भागातून अनेक महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.
सदरचा कार्यक्रम शेख परिवारातील तिसऱ्या पिढीतील मंडळींनी पुढाकार घेऊन हा यशस्वीपणे पार पाडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रशीद शेख, सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले तर युनूस शेख यांनी सर्वांचे आभार मानले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














