mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

करमाळा परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या ठार, शार्प शूटरांचा नेम लागला

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 18, 2020
in सोलापूर
धक्कादायक! सोलापूर जिल्ह्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात महीलेचे शीर धडापासून वेगळे

टीम मंगळवेढा टाईम्स ।

करमाळा तालुक्‍यात तीनजणांना ठार केलेल्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात वन विभाग व शार्प शूटरना यश आले. शुक्रवारी (ता. 18) सायंकाळी बिबट्या ठार झाल्याने करमाळावासीयांनी जल्लोष केला. बिबट्यावर वांगी नंबर चार, राखुंडे वस्ती (ता. करमाळा) चार येथे शार्प शूटरने गोळ्या घालून बिबट्याला ठार केले.

3 डिसेंबर रोजी फुंदेवाडी (रायगांव) येथे बिबट्याने ज्वारीला पाणी देण्यासाठी गेलेले कल्याण फुंदे यांना ठार केले, तर 5 डिसेंबर रोजी अंजनडोह येथील जयश्री शिंदे या लिंबोणीच्या बागेत लिंबे गोळा करण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावर हल्ला करत बिबट्याने त्यांनाही ठार केले. तर 7 डिसेंबर रोजी चिखलठार (ता.करमाळा) येथे ऊसतोडणी मजुरागी आठ वर्षीय मुलगी फुलाबाई हरिचंद हिच्यावर हल्ला केला. तिला उपचारासाठी कुटीर रुग्णालयात पोचवण्यापूर्वीच तिचे निधन झाले.

#पंढरपूर : करमाळ्यातील नरभक्षक बिबट्याला अखेर आज ठार मारण्यात आले. वांगी नंबर 4 येथील राखुंडे वस्तीमधील केळीच्या बागेमध्ये बिबट्याला ठार मारले. आज सायंकाळी बिबट्याला गोळ्या घालून मारण्यात आलेले आहे. #बिबट्या pic.twitter.com/L5baTphsWW

— ZEE २४ तास (@zee24taasnews) December 18, 2020

या क्रमश: घटनांमुळे करमाळावासीय भयभीत झाले होते. त्यानंतर बिबट्याने अधूनमधून दर्शन देत नागरिकांच्या मनातील भीती कायम ठेवली होती.

त्यानंतर भिवरवाडी (ता. करमाळा) येथे बिबट्याने सोमवारी (ता. 14) पहाटे तीनच्या सुमारास अनिल गोरख आरकिले यांच्या गोठ्यात बांधलेल्या गाय व वासरावर हल्ला केला. या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला तर गायीच्या मानेवर व गळ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने गाय बेशुद्ध पडली.

त्यानंतर बिबट्याचे दर्शन झाले नाही. वनविभागासह शार्प शूटर, ड्रोन कॅमेरे, डॉग स्क्वाड आदी लवाजमा बिबट्याला पकडण्यासाठी किंवा जंग-जंग पछाडलेला असताना शेवटी आज (शुक्रवारी) बिबट्याला ठार मारण्यात यश आले.

तालुक्यात अजून किती बिबटे आहेत? हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे. मात्र सध्या तरी नरभक्षक बिबट्याला ठार केल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: करमाळाठारबिबट्या

संबंधित बातम्या

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आ.समाधान आवताडेंचा धडाका! मंगळवेढ्याला म्हैसाळचे, तर पंढरपूरला कॅनॉलद्वारे मिळणार पाणी; वीज पुरवठाही ८ तास होणार

July 10, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हट्टापायी पोटचा मुलगा गेला…; सांगोल्यातील ‘या’ घटनेने पालकांचे डोळे उघडले, नक्की वाचा काय घडलं?

July 8, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

मंगळवेढ्यातील १ लाख ९९ हजार मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! २००२ च्या यादीत नाव नसेल तर ‘या’ कागदपत्रांशिवाय पर्याय नाही

July 7, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

गुन्हेगारांनो सावधान! सुधारा, नाहीतर थेट कारवाई..; पोलिसांची सिंघम स्टाईल ॲक्शन; पोलीस अधीक्षकांनी गुंडांना बोलावून भर चौकात दिला सज्जड दम; लिहून घेतले हमीपत्र

July 7, 2026
Next Post
Breaking! बालविवाह लावल्याप्रकरणी आई-वडिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल

गंठण गाठण्यासाठी गेलेल्या नगरसेवकाच्या पत्नीस चोरट्यांचा हिसका, सोन्याच्या बांगड्या लंपास

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

शेतकऱ्यांना दिलासा द्या, उजनी धरणातून पाणी सोडा; मंगळवेढ्यातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

July 14, 2026

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

July 14, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळीच्या विळख्यातून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘हा’ मास्टरप्लॅन; नागरिकांना केली मोठी विनंती

July 14, 2026
शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

July 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो लक्ष द्या! सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ‘या’ महत्त्वाच्या मार्गांवर अचानक मोठा बदल, नक्की काय घडणार? पालिकेचा मोठा निर्णय

July 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा