मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । फॉर्मात असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) संघानं नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) थकलेल्या वाघांची बेछूट शिकार करण्याच्या निर्धारानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
लोकेश राहुल ( KL Rahul) आणि मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) यांनी सुरुवातही तशीच करून दिली. पंजाबनं CSKसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. पण, रविवारचा दिवस CSKचा ठरला.
शेन वॉटसन ( Shane Watson) आणि फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf du Plessis) यांनी वैयक्तिक अर्धशतकासह पहिल्या विकेटसाठी दमदार भागीदारी करून CSKला विजय मिळवून दिला.
लोकेश राहुल व मयांक अग्रवाल या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६१ धावा जोडल्या. पीयूष चावलानं ही भागीदारी तोडली. त्यानं मयांकला २६ धावांवर माघारी पाठवले. करुण नायरच्या जागी संघात मनदीप सिंगला स्थान देण्यात आले होते आणि त्यानं दोन खणखणीत षटकार मारून त्याची निवड सार्थ असल्याचे दाखवले.
View this post on Instagram
Describe these two in one emoji ???????????????? #Dream11IPL #KXIPvCSK
मात्र, त्याला रवींद्र जडेजाच्या फिरकीचा अंदाज बांधता आला नाही. अंबाती रायुडूच्या हाती झेल देत मनदीप २७ धावांवर माघारी परतला. निकोलस पूरन आणि लोकेश यांनी दमदार फटकेबाजी करून KXIPचा डाव रुळावर आणला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली.
शार्दुल ठाकूरने ( Shardul Thakur) एकाच षटकात दोघांनाही माघारी पाठवले. सुरुवातीला त्यानं पूरनला बाद केले. पूरननं टोलावलेला चेंडू उत्तुंग उडाला, परंतु रवींद्र जडेजानं तो सुरेखरित्या झेलला. पुढच्याच चेंडूवर धोनीनं चपळतेनं लोकेशचा झेल टिपला आणि एका विक्रमाला गवसणी घातली.
पूरनने १७ चेंडूंत ३ षटकारांसह ३३ धावा, तर लोकेशनं ५२ चेंडूंत ७ चौकार व १ षटकार खेचून ६३ धावा केल्या. आयपीएलमधील MS Dhoniने यष्टिरक्षक म्हणून १००वा झेल घेतला. दिनेश कार्तिकनंतर हा पल्ला गाठणारा तो दुसरा यष्टिरक्षक आहे. सुरेश रैनानेही खेळाडू म्हणून १०० झेल टिपले आहेत. किंग्स इलेव्हन पंजाबला ४ बाद १७८ धावांपर्यंत मजल मारता आली.
CSKकडून असे प्रत्युत्तर मिळेल, याची कल्पना पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल यानंही केली नसावी. फॉर्माशी लडखडत असलेल्या शेन वॉटसननं KXIPच्या गोलंदाजांवर प्रहार केला. त्याच्या जोडीला फॅफ ड्यू प्लेसिस होताच.
आतापर्यंत सलामीच्या जोडीचं अपयश CSKची डोकेदुखी ठरत होती, त्याच सलामीवीरांनी विजयाचा मजबूत पाया रचला. या दोघांनी KXIPच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना दमदार भागीदारी केली. वॉटसन ५३ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ८३ धावा केल्या, तर फॅफनं ५३ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारासह ८७ धावांवर नाबाद राहीला. चेन्नईनं १७.४ षटकांत बिनबाद १८१ धावा केल्या.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज