mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मराठी अभिनेता किरण मानेंची कंगनासह समर्थकांनां सनसनाटी चपराक..!

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 7, 2020
in राष्ट्रीय
वायरमनला अतिरिक्त कामाचा बोजा; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मंगळवेढा महावितरणचे कर्मचारी असुरक्षित

मंगळवेढा टाईम्स ब्युरो : तानाजी गोरड

देशातील शेतकरी आंदोलन जगभरात पसरत आहे शेतकरी वाचवायचा असेल तर शेतकर्यांच्या विरोधातील विधेयक हटवलेच पाहिजे अशी धारणा आत्ता देशातील शेतकर्यांची आहे. मोदी सरकार च्या या निर्णयाला कॅनेडा, बार्झील, दुबई, आदी राष्ट्रामधुन अनिवासी भारतीयांनी विरोध दर्शवला आहे मात्र गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी आंदोलनावर कंगना सह काही लोक शेतकरी आंदोलनावर टिका करत आहेत.

मराठी अभिनेता किरण माने यांनी आपल्या फेसबुक वरुन कंगनासह शेतकरी आंदोलनवर टिका करण्यार्यानां चांगलंच सुनावलं आहे.

अस्सल मराठी मातीतील अभिनेता किरण माने शेतकर्यांच्याप्रश्नी नेहमीच धावुन येत असतो.

काय आहे पोस्ट:

व्हय ! माझ्या शहरातल्या दोस्ता.. कंगनाच्या भावा, कष्ट तू सुद्धा करतोस रं… मी नाय कुठं म्हंतूय? पन कसं हाय म्हायतीय का माझ्या सोन्या, तू केलेल्या कष्टाचा तुला पुरेपुर मोबदला मिळतो रं… हमखास ! खनखन वाजवून पगार घेतोस तू दरमहा !! माझ्या बळीराजाचा-शेतकर्‍याचा असा ‘हक्काचा इनकम’ नसतो !!!

किरण मानेचा एक डायलाॅग तू , तुझी ती कंगना आन् तिची बाजू घेनार्‍या पायचाटू-शेळपट-बुळग्या-सुमार दर्जाच्या कलाकारांना मेंदूत कोरून ठेवायला सांग :
“कष्ट करनं आन् ‘कष्टात जगनं’ या लै लै लैS फरक असतो गड्याहो”

‘व्यापारी’ आन् ‘शेतकरी’ ह्यातला फरकबी समजून घ्या चोंग्यांनो… शेतीमाल विकनार्‍या कुठल्या व्यापार्‍यानं कधी आत्महत्या केलेली ऐकलीय का??? त्यो कशाला आंदोलनं करंल? उलट या काळ्या कृषीकायद्याच्या जोरावर तर दलालांचे बंगले होतील, दारात गाड्या येतील..अधिकार्‍यांच्या घरी सोन्याची बिस्कीटं येतील.. मंत्र्यासंत्र्यांच्या दहा पिढ्या ऐश करत बसून खातील.. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘त्या’ दोन मोठ्या उद्योगपतींच्या संपत्तीत अब्जावधींची भर पडेल !

ते जाऊदे रं चोच्या, तुझ्या अकलेच्या पलीकडच्या हायेत या गोष्टी. तू ज्या वरनभातावर साजूक तुपाची धार सोडून मोठ्या आनंदानं वरपतोस ना, ते सगळं त्या शेतकर्‍याच्या कष्टातूनच तुझ्या घरी आलेलं असतं.. तुझी लाडकी कंगना पार्ट्या झोडताना जी दारू पिते ना, ती दारू बी त्याच्या शेतातल्या धान्यापास्नंच तयार झालेली असती… तुमचे पिताश्री जो लाखालाखाचा सूट घालतात, त्या सुटाचं कापडबी त्या शेतकर्‍याच्या शेतातल्या कापसापास्नंच तयार होतं !

माझा शेतकरी प्रत्येक हंगामात स्वत:ला मातीत गाडून घेतो… पुन्हा-पुन्हा उगवून येतो ! रक्ताचं पानी करुन पिक वाढवतो.. जोपासतो..मोठ्ठं करतो.. पन त्याच्या कणसाला टप्पोरं दाणं येत्यात – झाडाला फळं लगाडत्यात तवाच नेमकी ती फळं आन् धान्य परदेशातनं आयात व्हतं… माल टेम्पोत भरुन यार्डात येतो तवाच नेमकं व्यापारी भाव ढासळवत्यात !
बळीराजा सुखासुखी आत्महत्या आन् आंदोलनं करत नाय हे लक्षात घ्या बावळटांनो आन् आपली गटारतोंडं गप ठेवा.

काॅर्पोरेट शेतकर्‍यांना गब्बर करू पहाणारे, आणि खर्‍याखुर्‍या बळीराजाला देशोधडीला लावू पहाणारे कृषीविषयक काळे कायदे रद्द व्हावेत आणि किमान हमीभावाचा कायदा पास व्हावा, यासाठी शेतकर्‍यांच्या दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला एक ‘शेतकरी पुत्र’ म्हणून माझा संपूर्ण पाठिंबा !-किरण माने

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शिक्षिकेने ६ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली; पुढच्याच क्षणी चिमुकल्याचा जागीच तडफडून मृत्यू

August 22, 2026
मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ‘या’ एका कागदपत्राची सक्ती कायमची रद्द; लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

June 27, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण..

June 9, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
Next Post

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या उद्याच्या बंद बाबत मंगळवेढा व्यापारी महासंघानी घेतला 'हा' निर्णय

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 13, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

September 13, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

September 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा