टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी गावातील अनेक विद्यार्थी शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी सांगोला येथे जात असतात. आज सोमवार दिनांक १५ जुलै रोजी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान
सांगोला, राजापूरहून लक्ष्मी दहिवडी येथे येणारी एस टी. रस्त्यावरून नजीकच्या ओढ्यात घसरली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने कोणीही जीवित हानी झाली नसली तरी पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शिक्षणासाठी लक्ष्मी दहिवडीतील मुलांना गाव सोडून १५-२० किलोमीटर सांगोला येथे जावे लागत असून या मोठे गाव असुन सुद्धा शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहिले आहे.
लक्ष्मी दहिवडीतील विद्यार्थ्यांना दररोज एस टी बस ने सांगोला येथे प्रवास करावा लागत आहे सोमवार दुपारनंतर घरी परतताना सांगोला आगाराची एम एच १४ बी टी २८३९ या क्रमांकाची बस राजापूर हून फाटा येथे घसरली. या बस मध्ये महाविद्यालयाची १३० हून अधिक मुले असल्याची माहिती एस टी वाहक यांनी दिली.
दरम्यान एस टी अपघात का झाला याबाबत एस टी बस ड्राइवरशी चर्चा केली असता सदर रस्ता निकृष्ट व साईड पट्टी व्यवस्थित न भरल्याने एस. टी. ला वळण घेताना साईड पट्टी खचल्याने बस आडवी झाली.
सदर रस्त्याबाबत ठेकेदार यांना विचारले असता त्यांनी बस चालकाचे आरोप फेटाळून लावून ड्रायव्हरची चूक आहे असे सांगितले.
सुदैवाने बस मधील १२० पेक्षा जास्त प्रवाशी होते. अपघात घडल्यानंतर सांगोला आगर व्यवस्थापक घटनास्थळी हजर झाले. उपस्थित पालकांनी जादा बस बद्दल विचारले असता त्यांनी आगारात गाड्याच शिल्लक नाहीत असे सांगितले.
सदर अपघातात दोन विद्यार्थिनीना जास्त लागल्याने त्यांना खासगी वाहनाने सांगोला येथे हलवण्यात आले असुन सुदैवाने कोणती जीवीत हाणी झाली नाही.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज