टीम मंगळवेढा टाईम्स ।
पुणे महामार्गावर सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. पंढरपूरकडे जाणारा ट्रॅव्हल्स बस मागून ट्रॅक्टरला आदळून दरीत कोसळली. या बसमध्ये 54 प्रवासी होते. या अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला.
डोंबिवलीकडून पंढरपूरला यात्रेसाठी जात होते. पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. मध्यरात्री एकच्या दरम्यान ही घटना घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाटेच्या वेळी अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. त्यानंतर बस 20 फूट खाली दरीत कोसळली.
असा झाला अपघात
अपघातासंदर्भात नवी मुंबईचे डीसीपी विवेक पानसरे यांनी सांगितले की, सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर अपघात झाला.
एका खासगी बसमधून 54 जण आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जात होते. प्रवाशांनी भरलेली ही बस ट्रॅक्टरला धडकली. त्यानंतर बस दरीत पडली. अपघातात जखमी झालेल्या 42 जणांना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे, तर इतर तीन जणांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मृतांची संख्या वाढली
भाविकांनी भरलेली बस डोंबिवलीतील केळझर गावातून पंढरपूरला जात होती. मुंबई एक्स्प्रेस हायवेजवळ या बसने एका ट्रॅक्टरला धडक दिली. त्यावेळी घटनास्थळी चार जणांचा मृत्यू झाला.
त्यानंतर आणखी एका जणाचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
#WATCH | Mumbai | Four people died and several others were injured after a bus collided with a tractor and fell into a ditch near the Mumbai Express Highway. All the injured were admitted to the nearby MGM Hospital: Pankaj Dahane, DCP Navi Mumbai Police
The bus with devotees… pic.twitter.com/4HY3vdPVEp
— ANI (@ANI) July 15, 2024
१७ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्यासाठी विठ्ठरुयाचे दर्शन घेण्यासाठी भाविक जात होते. परंतु काळाने पाच प्रवाशांना दर्शन घेऊ दिले नाही. आषाढी एकादशीला राज्यभरातून वारकरी दिंडीद्वारे पंढरपूरला जात असतात. ज्यांना दिंडीने जाणे शक्य होत नाही, ते भाविक बस आणि रेल्वेने पंढरपूर गाठतात. लाखोंची गर्दी आषाढीला पंढरपूरला होत असते.
दुसऱ्या अपघातात तरुणाचा मृत्यू
नाशिक मुंबई महामार्गावर वैतरणा फाट्याजवळ भरधाव कंटेनरची मोटरसायकलने धडक दिली. या अपघातात कंटेनर मोटरसायकलस्वाराच्या डोक्यावरून गेल्याने मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला.
योगेश मदन परदेशी (वय ३०, राहणार खालची पेठ इगतपुरी) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाला त्या ठिकाणी पुलाचे काम चालू आहे. जागीच वळण आणि उतार आहे. त्या ठिकाणी दिशादर्शक फलकही नाही व मोठ्या प्रमाणत अंधार आहे. कंटेनर चालकाला घोटी पोलिसांनी घेतले आहे.(स्रोत:TV9 मराठी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज