मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क ।
सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालिन संचालक मंडळाने २०११ ते २०१३ दरम्यान जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून साखर तारण कर्ज घेतले होते. सांगोला कारखान्याने बँकेकडे तारण असलेली साखर परस्पर विक्री करून बँकेची ११ कोटी ४४ लाख ७६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सांगोला मध्यवर्ती बँक शाखेचे इन्स्पेक्टर अरविंद काळेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारखान्याचे तत्कालिन चेअरमन दीपक साळुंखे पाटील, व्हा. चेअरमन विश्वनाथ चव्हाण, कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांच्यासह २३ जणांविरुध्द शुक्रवारी गुन्हा दाखल झाला.
फिर्यादीनुसार सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन २०११ मध्ये सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना लिमिटेड, वाकी शिवणे (ता. सांगोला) यांना कर्ज मागणी प्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची ५० कोटी रुपये कर्ज मर्यादा मंजूर केली होती.
संगनमत करून, बँकेला माहिती न देता संचालकांनी साखर विकली…
चेअरमन दीपक साळुंखे (रा. जवळा), व्हा.चेअरमन विश्वनाथ चव्हाण (रा. हलदहिवडी), संचालक सुभाष दामोदर जाधव, अशोकराव बबनराव शिंदे, शहाजीराव आगतराव नलवडे, चेतनसिंह तात्यासाहेब केदार, वसंत गणपत जरे, राजेंद्र जगन्नाथ देशमुख कोळे, सदाशिव रामचंद्र साळुंखे,
मारुती तुळशीराम बनकर, शिवाजी भैयाजी व्हनमाने, दादासाहेब बळवंत देवकते, सदाशिव निवृती नवले, गुलाबराव बाबासाहेब पटेल, मच्छिंद्र यशवंत खरात, उल्हास दगडू ढेरे, मारुती नामदेव ढाळे, काकासाहेब काशीनाथ होवाळ, सुवर्णा तुकाराम जाधव, सुनंदा कृष्णा तरंगे,
सागर सुभाष पाटील, भिकाजी नारायण बाबर व कार्यकारी संचालक यशवंत शंकरराव कुलकर्णी यांनी बँकेकडून रीतसर करारनामा, वचनचिठ्ठी, जामीन व ताबे गहाणखत लिहून दिले होते.
संचालक मंडळाने आपसात संगनमत करून गोदामात तारण ठेवलेली साखर पोती ३१ जानेवारी २०१३ पूर्वी बँकेस कोणतीही माहिती न देता परस्पर विकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज