मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
हॉस्पिटलची जागा बिगरशेती करून देतो म्हणून ६ लाख ७१ हजार रुपये घेऊन जागा बिगरशेती न करता दमदाटी दिल्याप्रकरणी एकावर सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत डॉ. सुहास शंकरराव पाटील (रा. एसटी स्टैंड शेजारी, सांगोला) यांनी शुक्रवारी फिर्याद दिली. याप्रकरणी जगन्नाथ तुकाराम साठे (रा. धनगर गल्ली, सांगोला) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्यासह २१ संचालक डॉक्टरांनी मिळून भागीदारीत हॉस्पिटलच्या नवीन बांधकामासाठी सांगोला-महूद रोडलगत शेती गट नं. ४७६ मध्ये १ हेक्टर ९ आर
इतकी जागा हॉस्पिटलतर्फे डॉ. शिवराज भोसले यांच्या नावे खरेदी केली आहे. या जागेवरती हॉस्पिटल बांधायचे असल्याने ही जागा बिगरशेती करावयाची होती.
याकरिता आरोपी व डॉ. शिवराज भोसले यांच्यामध्ये २२ मे २०२२ रोजी तोंडी करार होऊन ही जागा बिनशेती करण्याकरिता आरोपी यांना ७ लाख रुपये देण्याचे ठरले.
फिर्यादीकडून २४ मे २०२२ पासून ते ८ एप्रिल २०२३ पर्यंत वेळोवेळी सुमारे ६ लाख ७१ हजार रुपये रोख स्वरूपात आरोपी यास दिले होते.
दरम्यान, हॉस्पिटलची जागा बिगरशेती होत नसल्याने आरोपी यांनी घेतलेले ६ लाख ७१ रुपये तुम्हास परत देतो म्हणून त्यांनी १२ नोव्हेंबर २०२४ रोजी बँक ऑफ इंडिया सांगोला शाखेचा धनादेश दिला होता मात्र तो वठला नाही, असेही फिर्यादीत म्हटले आहे.
चेक बाऊन्स झाला
तो धनादेश वटविण्याकरिता बँकेत भरला असता खात्यामध्ये पैसे नसल्याने तो चेक बाउन्स झाला म्हणून दिलेली रक्कम मिळण्याकरिता फिर्यादी यांनी वकिलामार्फत नोटीस पाठविले.
यावर आरोपी त्याने फिर्यादीवर चिडून ‘मी पत्रकार आहे, तुमची व तुमच्या हॉस्पिटलची बदनामी करीन,’ अशी दमदाटी दिली. फिर्यादीकडून घेतलेले पैसे परत न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज