बाळासाहेब झिंजुरटे । सांगोला तालुक्यातील कोळा येथील एका व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.
कोला ता.सांगोला येथील एका महीलेचा शनिवार दि.11 जुलै रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सदर महिला व्यक्तीचे निकट संपर्कात आलेले ( high risk contacts ) कोळा येथील 3 आणि बलवडी येथील 9 असे एकुण संख्या 12 होती.त्या 12 व्यक्तींचे कोरोना चाचणी कामी स्वॅब कोविड केअर सेंटर सांगोला येथे रविवार दि.12 जुलै रोजी घेण्यात आलेले होते.
त्यापेकी 11 जणांचे कोरोना चाचणी अहवाल मंगळवार दि.14 जुलै रोजी प्राप्त झाली असुन ते सर्व 11 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. उर्वरीत 1 अहवाल कोळा ता.सांगोला येथील बुधवार दि.15 जुलै रोजी प्राप्त झाला असुन तो 1 अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
सदर व्यक्तीस कोवीड केअर सेंटर मेडशिंगी येथे विलगीकरण कक्षात ठेवणेत आलेला आहे.आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज आहे असे आवाहन उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.
————————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज