mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आ.समाधान आवताडेंकडून ‘त्या’ कार्यकर्त्याच्या पायात चप्पल घालून केला सन्मान; सत्कारावेळी अश्रू अनावर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 3, 2021
in मंगळवेढा, राजकारण

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत समाधान आवताडे विजयी व्हावेत; म्हणून मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील दत्ता साबणे या कार्यकर्त्याने चप्पल घालणे थांबवले होते. जोपर्यंत समाधान आवताडे हे आमदार होत नाहीत; तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा दत्ता साबणे यांनी घेतली होती.

त्यांच्या या प्रतिज्ञेला यश आले आणि समाधान आवताडे हे आमदार झाले. आपल्यासाठी नवस बोलणाऱ्या कार्यकर्त्याचा नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांनी थेट त्याच्या घरी जाऊन त्याच्या पायात चप्पल घालून त्याचा पेहराव देऊन सत्कार केला. सत्काराप्रसंगी आमदार आवताडेंच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर समाधान आवताडे हे निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने चाचपणी करत होते.त्या वेळी नंदेश्वर येथील त्यांचे समर्थक कार्यकर्ते दत्तात्रेय साबणे यांनी ‘जोपर्यंत समाधान आवताडे आमदार म्हणून विजयी होत नाहीत, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही’ अशी प्रतिज्ञा केली.

त्यांच्या या अनोख्या प्रतिज्ञेमुळे या परिसरामध्ये कुतुहलाचा विषय झाला होता. आमदार प्रशांत परिचारक व दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे या दोन्ही गटाचे मनोमिलन झाल्यामुळे समाधान आवताडे यांचा विजय होण्याचा मार्ग सोपा झाला होता.

त्यातूनच 3 हजार 733 मतांनी आवताडे हे विजयी झाले. नवनिर्वाचित आमदार आवताडे यांनी आज नंदेश्वर येथील दत्तात्रय साबणे यांच्या घरी जाऊन त्यांच्या पायात नवीन चप्पल घालत व त्यांचा सत्कार केला.

यावेळी संत दामाजी ट्रस्ट समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे, जिल्हा फेडरेशनचे सरोजभाई काझी, माजी जि.प.सदस्य नामदेव जानकर, माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक चौंडे,भारत गरंडे, आकाश डांगे, रुक्मिणीताई दोलतोडे, बापू गरंडे, पिंटू बंडगर, तुकाराम मोटे,बबलू सुतार व इतर ग्रामस्थ उपस्थित होते

भूमिपुत्र आमदार व्हावा म्हणून नवस केला

मंगळवेढा तालुक्यातील व्यक्ती पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचा आमदार व्हावा, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. त्यातच पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत समाधान अवताडे यांना भाजपने उमेदवारी दिली.

त्यामुळे कार्यकर्ते त्यांच्या विजयासाठी जिवाचे रान करत असताना आपण यामध्ये काहीतरी योगदान द्यावे. म्हणून जोपर्यंत ते आमदार होत नाही; तोपर्यंत चप्पल न घालण्याची प्रतिज्ञा केली होती. समाधान आवताडे हे आमदार म्हणून विजयी झाले आणि माझी ती प्रतिज्ञा पूर्ण झाली. त्याचे समाधान वाटते, अशी भावना कार्यकर्ते दत्तात्रय साबणे यांनी व्यक्त केली.

दत्ता साबणे यांच्यासारखे कार्यकर्ते हीच राजकीय मंडळीची ताकद : आ. समाधान आवताडे

राजकारण आणि समाजकारण या सेवाव्रत विश्वात वावर अथवा कार्य करत असताना अनेक लोकांचा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष संबंध येत असतो. पुढे जाऊन हीच संबंधरुपी प्रेमाची वीण इतकी घट्ट होते की, आपल्या नेत्याच्या राजकीय समृद्धीसाठी व त्यांच्यावरील प्रेमापोटी कार्यकर्ता हा काय करेल याचा नेम राहत नाही.

आणि याचाच प्रत्यय मंगळवेढा तालुक्यात नुकताच पहावयास मिळाला त्याचे झाले असे की, दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे जोपर्यंत आमदार होत नाहीत तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याची भीष्मप्रतिज्ञा करणारे नंदेश्वर गावचे सुपुत्र दत्तात्रय साबणे यांचे पण आज फळाला आले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.समाधान आवताडेमंगळवेढा

संबंधित बातम्या

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात हॉटेलच्या स्वयंपाकघरातच मालकिणीने उचलले टोकाचे पाऊल; घटनेने परिसरात खळबळ

May 27, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

सोलापूर विधानपरिषद निवडणूक: उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम; कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली; मुंबईत लॉबिंग सुरू; परीचारकांचे नाव आघाडीवर पण…

May 26, 2026
मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची बैठक; पक्षबांधणीवर भर, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदांच्या ‘या’ नावांची जोरदार चर्चा

मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची बैठक; पक्षबांधणीवर भर, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदांच्या ‘या’ नावांची जोरदार चर्चा

May 26, 2026
एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

राजकीय घडामोडींना वेग! मंगळवेढ्यात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाची आज मोठी बैठक; ३७ सेलच्या निवडींबाबत होणार खलबतं; आजी-माजींसह इच्छुकांना बोलावले

May 24, 2026

मंगळवेढ्यात खळबळ! शासकीय कामात अडथळा; शेत रस्त्याच्या कामावरून मंडळ अधिकारी व तलाठ्याला दमदाटी, गुन्हा दाखल

May 24, 2026
🛑मंगळवेढ्यात पिस्तुल घेऊन आले आणि थेट पोलिसांच्याच जाळ्यात अडकले; कोठून आणले पिस्तुल? कोणाचा गेम करणार होते? मंगळवेढ्यातील ‘त्या’ दोघांच्या अटकेने मोठी खळबळ

🛑मंगळवेढ्यात पिस्तुल घेऊन आले आणि थेट पोलिसांच्याच जाळ्यात अडकले; कोठून आणले पिस्तुल? कोणाचा गेम करणार होते? मंगळवेढ्यातील ‘त्या’ दोघांच्या अटकेने मोठी खळबळ

May 24, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! मंगळवेढ्यात ‘नीट’ पेपर फुटीचे लोन? निकाल लागण्यापूर्वीच बॅनरबाजी करणारे ‘ते’ कोचिंग क्लासेस CBI च्या रडारवर?

May 22, 2026
Next Post
Breaking! राज्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे यांचे निधन

Breaking! राज्याचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे यांचे निधन

ताज्या बातम्या

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

हिशोब चुकला, गेम उलटला! निवडणूक खर्च वेळेत न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील १८ उमेदवारांवर ३ वर्षांची बंदी

May 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बापानं मजुरी करून गुरुजी बनवलं, पण गुरुजींनी माणुसकीच सोडली; आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाच्या थेट पगारावरच जप्ती

May 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात हॉटेलच्या स्वयंपाकघरातच मालकिणीने उचलले टोकाचे पाऊल; घटनेने परिसरात खळबळ

May 27, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! थायलँड-व्हिएतनाममधून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर नजर; हुबेहुब प्रोफाइल बनवून मोठा फ्रॉड

May 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा