mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नागरिकांनो! कोरोना काळात तुम्ही कोविशील्ड लस घेतली असेल तर ही बातमी वाचा..; लस निर्माता कंपनी ॲस्ट्राझेनेकाची न्यायालयात कबुली

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 2, 2024
in आरोग्य, राष्ट्रीय
चांगली बातमी! कोरोनाचे पाहिले लसीकरण ‘या’ देशात; 12 डिसेंबरपासून लस टोचली जाण्याची शक्यता

टीम मंगळवेढा टाईम्स। 

कोरोनावरील आपल्या ‘कोविशील्ड’ लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होणे आणि प्लेटलेट्स कमी होणे, यांसारखे काही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, अशी कबुली ब्रिटिश औषध उत्पादक कंपनी अॅस्ट्राझेनेकाने दिली आहे.

रक्ताच्या गुठळ्या तयार होणे, प्लेटलेट्स कमी झाल्याने हृदयविकाराचा झटका, ब्रेनस्ट्रोकचा धोका निर्माण होऊन प्रसंगी मृत्यूदेखील ओढावू शकतो. त्यामुळे कंपनीच्या या कबुलीमुळे जगभरात खळबळ माजली आहे.

अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविशील्ड लसीचे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्पादन केले आणि भारतातील कोरोना लसीकरण कार्यक्रमात या लसीचा सर्वाधिक वापर करण्यात आला.

अॅस्ट्राझेनेकाची कोरोना लस घेतल्यामुळे अनेक लोकांना गंभीर आजाराची लागण झाली. तसेच अनेकांचा मृत्यू झाला, असा आरोप करण्यात आला आहे. द डेली टेलिग्राफ या ब्रिटिश दैनिकानुसार ५१ पीडितांनी लंडनच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

याप्रकरणी कंपनीने दस्तावेज सादर करत आपल्या लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होणे आणि प्लेटलेट्सची संख्या कमी होणे, यांसारखे काही दुष्परिणाम होऊ शकतात, अशी कबुली दिली.

वैद्यकीय भाषेत याला थ्रॉम्बोसिस थ्रॉम्बोसायटोपेनिया सिंड्रोम (टीटीएस) असे म्हणतात. टीटीएसमुळे हृदयविकाराचा झटका येणे, ब्रेनस्ट्रोक, फुफ्फुसांचा रक्तप्रवाह बाधित होणे इत्यादी दुष्परिणाम उद्भवू शकतात, असे अॅस्ट्राझेनेकाने न्यायालयात मान्य केले आहे.

प्रतीक्षा संपली! मंगळवेढ्यात उद्यापासून ‘रंगप्रभा टुरिंग टॉकीज’ सुरू; बडे मिया छोटे मिया व नाच गं घुमा हे दोन चित्रपट होणार प्रदर्शित

हे दुष्परिणाम क्वचित आढळू शकतात. त्यामुळे चिंतेचा कारण नसल्याचेही कंपनीने न्यायालयात सांगितले. चिंतेचे कारण नाही अॅस्ट्राझेनेकाच्या लसीविरोधात जेमी स्कॉट नामक व्यक्तीने सर्वप्रथम तक्रार केली होती. स्कॉटच्या दाव्यानुसार त्याने एप्रिल २०२१ मध्ये या लसीचा डोस घेतला.

मात्र या लसीमुळे आपल्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या. याचा परिणाम माझ्या मेंदूवर झाला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी माझ्या पत्नीला मी लवकरच मरणार असल्याचेही सांगितले होते.

या लसीचा आपल्याला मोठा शारीरिक व मानसिक त्रास झाला, असा आरोप स्कॉटने केला. दरम्यान, हे दुष्परिणाम क्वचित प्रकरणांमध्ये आढळू शकतात. त्यामुळे चिंतेचा कारण नसल्याचे कंपनीने न्यायालयात सांगितले.

कोविशील्डचे भारतात सर्वाधिक १७५ कोटी डोस

अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविशील्ड लसीचे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या औषध उत्पादक कंपनीत उत्पादन करण्यात आले आणि भारतासह जगभरात ही लस पाठवण्यात आली.

उपलब्ध आकडेवारीनुसार जानेवारी २०२२ पर्यंत या लसीचे १७० हून अधिक देशांमध्ये २५० कोटींहून अधिक डोस देण्यात आले.

भारतातील कोरोना लसीकरण मोहिमेत आतापर्यंत २ अब्ज २० कोटी ६८ लाखांहून अधिक डोस देण्यात आले असून त्यामध्ये कोविशील्ड लसीच्या डोसची संख्या १ अब्ज ७४ कोटी ९४ लाख इतकी आहे. म्हणजेच भारतात कोविशील्ड लसीचे सर्वाधिक डोस देण्यात आले आहेत.

‘कोविशिल्ड’ घेतलेल्यांनी चिंता करू नये वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना

अॅस्ट्राझेनेकाने विकसित केलेल्या व सीरम इन्स्टिट्यूटने ऑफ इंडियाकडून उत्पादित ‘कोविशिल्ड’ या कोरोना प्रतिबंधक लसीमुळे दुर्मिळ प्रकरणांत रक्ताच्या गुठळ्या होणे व प्लेटलेट्स कमी होण्याचा धोका असतो. त्या आजाराला थ्रोम्बोसिस वुईथ थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम (टीटीएस) असे म्हणतात. हे दुष्परिणाम अॅस्ट्राझेनेकानेच लंडन कोर्टात मान्य केले असले तरी

त्यामुळे लोकांनी चिंता करून नये, असे दुष्परिणाम खूपच कमी लोकांवर होतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्टे केले आहे.

दुष्परिणाम नेमक्या कशामुळे झाले हे सांगणे कठीण असते, असे जनरल पीपल्स हेल्थ ऑर्गनायझेशन-इंडियाचे सरचिटणीस डॉ. ईश्वर म्हणाले.

लसीमुळे अनेक गोष्टींचा धोका होतो कमी

■ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोरोनाविषयक कृती दलाचे को- चेअरमन डॉ. राजीव जयदेवन म्हणाले की, ज्यांनी लस घेतली आहे त्यांना कोरोनाने मृत्यू किंवा बरे झाल्यानंतर हृदयविकाराचा झटका, पक्षाघात होण्याचा धोका कमी असतो.

■ लसींचे होणारे फायदे अधिक आहेत. अमेरिकेत लस घेण्यास नकार देणारे वा घेण्यास घाबरलेल्यांपैकी २,३२,००० ते ३,१८,००० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना लसीकरण

संबंधित बातम्या

काळजी घ्या! मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा चोविसावा बळी; 46 वर्षीय पुरुषाचा मृत्यू

दोन महिन्यांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली; गॅसच्या स्फोटात जखमी झालेल्या मंगळवेढ्यातील ‘त्या’ महिलेचा मृत्यू

August 24, 2025
शेतकऱ्यांनो! कृषी योजनांच्या लाभासाठी पात्र लाभार्थीनी अर्ज करावा; मंगळवेढ्याच्या कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांचे आवाहन

नागरिकांनो! आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मंगळवेढ्यात आज रानभाजी महोत्सवाचे आयोजन; कुठलेही रासायनिक औषधे न वापरलेल्या रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री

August 21, 2025
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

राज्यातल्या जनतेला मोठं गिफ्ट, मंत्रिमंडळ बैठकीत 4 धडाकेबाज निर्णय; राज्यातील ‘या’ विभागाचा चेहरामोहरा बदलणार

August 20, 2025
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

वैद्यकीय क्षेत्रात खळबळ! वैद्यकीय पदवी नसताना उपचार; दोन बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल; तालुका आरोग्य विभागाची कारवाई

August 18, 2025
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

साडेतीन कोटी तरूणांना 15 हजार मिळणार, स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींचं गिफ्ट; कोण ठरणार पात्र?

August 16, 2025
Good News! मंगळवेढा शहरात ‘सिटी स्कॅन’ सेंटर सुरू; अत्यंत माफक दरात मिळणार सेवा

नागरिकांनो! मंगळवेढा शहरात निदान हायटेक ‘सिटी स्कॅन’ सेंटर आजपासून सुरू होणार; स्कॅनचा रिपोर्ट त्वरित व्हाट्सअँपवर मिळणार

August 15, 2025
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

सोनेप्रेमींचे टेन्शन वाढणार! दागिने खरेदी करायचंय? मग आत्ताच करा; भविष्यातील संकेत पाहूनच धडकी भरेल…

August 15, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

बापरे..! संसारात ढवळाढवळ, जावयाची सटकली; सासूला कायमचं संपवलं, शरीराचे १९ तुकडे करून…

August 15, 2025
मोठा झटका! राहुल गांधींना कोर्टानं सुनावली दोन वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

पिक्चर अभी बाकी है..! व्होट चोरीवरुन राहुल गांधींचा भाजपला इशारा; गांधींच्या प्लॅनने वाढवलं भाजपचं टेन्शन?

August 13, 2025
Next Post
मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

मंगळवेढेकरांनो! आजपासून मंगळवेढा महोत्सवास प्रारंभ; दलितमित्र कदम गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मिळणार दरमहा ‘एवढे’ हजार रुपये; शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना; जाणून घ्या काय आहे योजना?

August 26, 2025
मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंद; सोलापूर जिल्हा बंद ? बाबत नवी घोषणा

मराठा आरक्षणाची ठिणगी पेटणार; तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, सरकारच्या वेळकाढूपणामुळे विष प्राशन केल्याची चिठ्ठी

August 26, 2025
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

सर्वात मोठी बातमी! मराठा समाजाचा मोठा विजय; मनोज जरांगे पाटलांची पहिली मागणी मान्य, राज्य सरकारची घोषणा

August 26, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

आर-पार लढाईची घोषणा! गणपतीच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईत धडकण्यावर ठाम; सर्व मराठ्यांनी कामधंदे बंद करून मुंबईकडे निघा..; मनोज जरांगेंच्या यावेळच्या मागण्या नेमक्या काय?

August 26, 2025
पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

August 26, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! जेवणाच्या बिलावरून हॉटेल मालकाला गळा दाबून मारहाण; हॉटेलमध्ये तोडफोड करून आरोपींनी ठोकली धूम

August 26, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा