मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
संसार मोडल्याच्या रागातून जावयाने सासूवर सत्तुरने हल्ला केल्याची घटना बामणी (ता.खानापूर) येथे शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.
ऋषिकेश अशोक कुंभार (जुना देगाव नाका, साठे वस्ती, सोलापूर) असे संशयिताचे, तर वैशाली अर्जुन कुंभार असे जखमी महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ऋतुजा ऋषिकेश कुंभार यांनी पतीविरुद्ध विटा पोलिसांत फिर्याद दिली. संशयित व त्याच्या पत्नीचा विटा न्यायालयात घटस्फोटाबाबतचा खटला सुरू आहे.
ऋतुजा यांच्या आईचे बामणी येथे हॉटेल आहे. संशयिताने पत्नीला पाहायचे आहे, असे सांगून हॉटेलमध्ये आला. सासूने, ‘मुलीस पाहिले ना, आता जावा,’ असे म्हटल्याचा राग मनात धरून
सोबत आणलेला सत्तुर बाहेर काढला व सासूला ‘तुला आता जिवंत ठेवत नाही, तू माझा संसार मोडतेस,’ असा जाब विचारून तिच्या मानेवर, पाठीत, डाव्या हाताच्या अंगठ्यावर वार करून तिला गंभीर जखमी केले, तिच्या खुनाचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, हल्ल्यानंतर ऋषिकेश पळून गेला. त्याच्या शोधासाठी पोलिस पथक सोलापूरला रवाना केल्याचे व जखमीवर कऱ्हाड येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
खुनी हल्ला केल्याबद्दल संशयितांवर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे तपास करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज