mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

रेनबो किड्स इंग्लिश मिडीयम स्कूलमुळे सलगर परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार, उद्याच्या उज्वल पिढीला साक्षरतेचे पैलू पडतील; आ.समाधान आवताडे यांचे गौरोउद्गार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 8, 2025
in मंगळवेढा, राजकारण, शैक्षणिक
रेनबो किड्स इंग्लिश मिडीयम स्कूलमुळे सलगर परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार, उद्याच्या उज्वल पिढीला साक्षरतेचे पैलू पडतील; आ.समाधान आवताडे यांचे गौरोउद्गार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागात रेनबो किड्स इंग्लिश मिडीयम स्कूलमुळे सलगर परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार असल्याचे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे. ते सलगर बुद्रुक येथे रेनबो इंग्लिश मीडियम स्कूलच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

सलगर बुद्रुक येथे डॉक्टर विजय धायगोंडे व डॉक्टर सुनिता धायगोंडे तसेच गावचे माजी सरपंच शिवशंकर धायगोंडे या धायगोंडे कुटुंबाकडून सलगर बुद्रुक ते सलगर खुर्द रस्त्या लगत रेन्बो इंग्लिश मीडियम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची निर्मिती करण्यात आली आहे.

या शाळेचे उद्घाटन आमदार अवताडे यांच्या हस्ते ठेवण्यात आले होते. त्यादरम्यान इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार समाधान आवताडे बोलत होते.

ज्ञान, संस्कार आणि संस्कृती यांचे भरणपोषण करण्याचे क्रांतिदूत माध्यम असणाऱ्या रेनबो किड्स इंग्लिश मिडीयम स्कूल या शिक्षण सेवेतून उद्याच्या उज्वल पिढीला साक्षरतेचे पैलू पडतील असा विश्वास आमदार महोदय यांनी यावेळी बोलताना व्यक्त करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण होते. याप्रसंगी सलगरचे सरपंच सुदाम कदम, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पांडुरंग कांबळे, उपसरपंच कुमार स्वामी, आसबेवाडीचे सरपंच शाम आसबे, आसबेवाडीचे पोलीस पाटील महेश आसबे, वसंत आसवे सर, लवंगीचे सरपंच पूनम हुवाळे, माजी सरपंच अप्पा माने,

मुक्ताई मतिमंद मुलाचे बालगृह संस्थापक अध्यक्ष शिवाजी जाधव, माजी सरपंच विठ्ठल सरगर, जंगलगी सरपंच आमसिद्ध चौखंडे, उपसरपंच चंद्रकांत चौखंडे, माजी सरपंच राजकुमार बिराजदार, पौटचे सुरेश निमंगरे, माजी सरपंच राजाराम निमंगरे, सलगरचे माजी सरपंच तानाजी जाधव,

तंटामुक्त अध्यक्ष दत्ता टिक्के, डॉ.नितीन बिराजदार  विद्या मंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक जाधव, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सिद्धाप्पा बिराजदार, विठ्ठल बिराजदार,

शिक्षण प्रसारक मंडळ सचिव सुशील मेनगुदली, व नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मंगळवेढा सर्व डॉक्टर पदाधिकारी कर्मचारी आदीजन उपस्थित होते.

म्हैसाळ योजनेतून पाणी मिळवण्यासाठी आमदार अवताडे यांचा निर्धार

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात मंगळवेढा तालुक्यातील 19 गावांचा समावेश आहे या 19 गावांना 1.27 टीएमसी पाणी मंजूर आहे.पण दुर्दैवाने फक्त. 25 टीएमसी एवढेच पाणी माझ्या मंगळवेढा तालुक्यातील 19 गावातील शेतकऱ्यांना मिळत आहे.

बाकी उर्वरित एक टीएमसी पाणी कुठे जाते याचा मी तपास काढला असून ते एक टीएमसी पाणी माझ्या मतदारसंघातील 19 गावांना दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही असे मत आमदार समाधान दादा अवताडे यांनी मांडले.

ते पुढे बोलताना म्हणाले की, दक्षिण मंगळवेढ्यातील 19 गावांचा म्हैसाळ उपसा सिंचन योजनने मध्ये समावेश आहे.या गावांना 19 टीएमसी पाणी उपलब्ध असताना काही तांत्रिक व राजकीय अडचणी पोटी मंजूर असलेले पाणी सदरच्या गावाला मिळत नाही.हे पाणी कुठे मुरतंय याचा शोध घेऊन या संदर्भामध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री मुख्यमंत्री यांच्याशी मी या विषयावर चर्चा केली आहे.

जत तालुक्यातील खैराव या गावातून मंगळवेढा तालुक्याला साडेचारशे क्यू सेक्स या दाबाने पाणीपुरवठा होण्याऐवजी अडीचशे क्युसेक्स नेच पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे 1.27 टीएमसी ऐवजी पॉईंट पंचवीस टीएमसी पाणी मंगळवेढ्यातील गावांना मिळत आहे.

खैराव येथील कॅनल मधून पुरेशा साडेचारशे क्यूसेक्स दाबाने पाणी सोडल्याशिवाय मंगळवेढ्यातील 19 गावांना पाणी मिळणार नाही. त्यासाठी आराखड्यात बदल करून बंद पाईपलाईन द्वारे मंगळवेढा तालुक्यातील पडळकरवाडी,शिरनांदगी,लवंगी,मारोळी ही चार तलावे भरण्यासाठी नवीन आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे.

आराखड्याचे काम झाल्यानंतर त्या संदर्भात वर्क ऑर्डर काढून हे काम जलद गतीने करून घेऊन सदरच्या गावातील दुष्काळ कायमस्वरूपी मिटवण्याचा मी प्रयत्न करत आहे.

दरम्यान मागील 60 ते 65 वर्षाच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा असेल तर मला आणखीन काही वर्षांची संधी आवश्यक आहे.मी आमदार होऊन आत्ता तीन-चार वर्षे झाले आहेत.या तीन ते चार वर्षात चार हजार कोटी रुपयांचा निधी आपल्या मतदारसंघात आणला आहे.तरीपण अजूनही विकास संपूर्ण झालेला नाही.

मायबाप जनतेचे आशीर्वाद पाठीशी असल्याने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा विकास राज्यामध्ये अग्रगण्य करण्यात माझा भर राहील असे मत अवताडे यांनी मांडले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: रेनबो किड्स इंग्लिश मिडीयम स्कूल

संबंधित बातम्या

स्व.जनाबाई आवताडे यांचे आज व्दितीय पुण्यस्मरण; भजन, पुष्पवृष्टीचे आयोजन

स्व.जनाबाई आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवेढ्यात कीर्तन सोहळा; हिंदूभूषण सुनिताताई आंधळे यांची उपस्थिती

September 29, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ जावयाला रस्त्यावर पाडून दगडाने ठेचले; सासऱ्याचा मंगळवेढ्यात थरारक राडा; सासू, सासरे आणि पत्नीवर पोलीस कारवाई

September 25, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! काळ्या आईची सेवा करतानाच काळाची झडप; मंगळवेढ्यात सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

September 24, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
Next Post

मेडिकल औषधे घेवून जाणाऱ्या विवाहित महिलेचा विनयभंग; युवकावर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

September 29, 2026
स्व.जनाबाई आवताडे यांचे आज व्दितीय पुण्यस्मरण; भजन, पुष्पवृष्टीचे आयोजन

स्व.जनाबाई आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवेढ्यात कीर्तन सोहळा; हिंदूभूषण सुनिताताई आंधळे यांची उपस्थिती

September 29, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा