mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी यांची वर्णी, तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 24, 2022
in राजकारण, राज्य, सोलापूर
Big Breaking! भाजप-‘शिंदे’सेना सरकारचा ‘या’ दिवशी शपथविधी होण्याची शक्यता? मंत्रीपदांचे वाटप असे होणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

जवळपास तीन महिन्यानंतर महाराष्ट्राला पालकमंत्री मिळाले आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत.

सोलापूरच्या पालकमंत्रीपदी राधाकृष्ण विखे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजकीय प्रवास हा शिवसेना, काँग्रेस आणि भाजप असा राहिला आहे.

महाविकास आघाडीचा काळ सोडला तर सर्वच पक्षांच्या सरकारमध्ये ते मंत्री राहिले आहेत. पूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात विखे-पाटील काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते होते.

त्यानंतर जून २०१९ मध्ये ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी गृहनिर्माण, परिवहन, शिक्षण ही खाती सांभाळली आहेत. युतीच्या सरकारमध्ये ते कृषीमंत्रीही होते.

आता त्यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, त्यामुळे रखडलेली विकासकामे मार्गी लागण्याची आशा आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्याहीचं पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं नाही. दीपक केसरकर यांच्याकडे मुंबई शहर आणि कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं पालकमंत्र्यावर शिंदे सरकारवर निशाणा साधला होता. अजित पवार, सुप्रिया सुळे, नाना पटोले आणि आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी शिंदे सरकारला पालकमंत्र्यावरुन खडे बोल सुनावले होते. अखेर आज शिंदे सरकारनं पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे.

जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:

देवेंद्र फडणवीस – नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर

सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया
चंद्रकांत दादा पाटील- पुणे,
विजयकुमार गावित- नंदुरबार
गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड

गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव
दादा भुसे- नाशिक
संजय राठोड- यवतमाळ, वाशिम
सुरेश खाडे- सांगली
संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड
तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग
अब्दुल सत्तार- हिंगोली

दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर
अतुल सावे – जालना, बीड
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे
मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

भाजपकडे किती जिल्हे?

भाजपकडे 21 जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे.

तर गिरीश महाजन यांच्याकडे तीन जिल्ह्याचं पालकमंत्री आलेय. मुंबई उपनगर, जालना, बीड, पालघर, सिंधुदुर्ग, सांगली, धुळे, लातूर, नांदेड, नंदुरबार, पुणे, चंद्रपूर, गोंदिया, अहमदनगर, सोलापूर, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा आणि गडचिरोली

15 जिल्हे शिंदे गटाकडे –

15 जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या जबाबदारी शिंदे गटाला मिळाली आहे. सातारा, ठाणे, मुंबई शहर , कोल्हापूर, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, रत्नागिरी, रायगड,औरंगाबाद, यवतमाळ, वाशिम, नाशिक, बुलढाणा आणि जळगाव हे जिल्हे शिंदे गटाकडे आले आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पालकमंत्री

संबंधित बातम्या

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
Next Post
शेतकऱ्यांना कष्टाचे फळ मिळणार; पहिल्या हंगामात ऊसाला ‘एवढा’ दर देणार; अभिजित पाटील चेअरमन होताच केली मोठी घोषणा

अभिजीत पाटलांच्या मनात काय? सध्या मी कोणत्याच पक्षात नाही; पण... तोच पक्ष निवडणार असल्याचे केले जाहीर

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 17, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा