mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढेकरांनो! शहरात आजपासून फक्त ‘ही’ दुकाने सकाळी 7 ते 11 वेळेत सुरू राहणार; यादी वाचा सविस्तर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 3, 2021
in मंगळवेढा
मंगळवेढ्यातील दुकानाची वेळ आजपासून ‘ही’ असणार, ‘या’ नियमांचे असणार बंधन

टीम मंगळवेढा टाइम्स ।

मंगळवेढा शहरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून पाळण्यात आलेला जनता कर्फ्यु सोमवारी समाप्त झालेला असल्याने आजपासून अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू राहणार असल्याची माहिती नगरपालिकेचे कर निरीक्षक विनायक साळुंखे यांनी दिली.

मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीच्या दरम्यान मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत होती.त्यामुळे व्यापारी संघटनेनी पुकारलेला 15 दिवसाचा कडक जनता कर्फ्यु पाळण्यात आला होता.

मंगळवेढा शहर, संत दामाजी नगर व संत चोखामेळा नगर ग्रामपंचायत मधील सर्व व्यवसायिकांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दि.30 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशान्वये आजपासून ते दि.15 मे 2021 पर्यंत फक्त अत्यावश्यक दुकानांना कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करून सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत दुकान उघडण्यास परवानगी असेल. शनिवार व रविवार पूर्णपणे बंद असेल. शनिवार व रविवार फक्त दूध (सकाळी 7 ते 10 व सायंकाळी 5 ते 8), मेडिकल व दवाखाना यांना परवानगी असेल.

दुकान मधील दुकान मालक व कर्मचारी यांच्याकडे लस किंवा कोरोना टेस्ट केलेले रिपोर्ट असणे बंधनकारक असणार आहे. सर्वांनी सुरक्षित अंतर पाळावे. नागरिकांनी ही दुकानासमोर गर्दी करू नये. मस्कचा वापर करावा.

विनाकारण घराच्या बाहेर पडू नका. भाजीपाला व फळे यांनी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत फिरून विक्री करायची असल्याचे त्यांनी सांगितले.

मंगळवेढा शहर, संत दामाजी नगर व संत चोखामेळा नगर ग्रामपंचायत मधील सर्व व्यवसायिकांनी कोरोना ची भयानक परिस्थिती असल्याने आपण सर्वांनी मिळून 15 दिवस जनता कर्फ्यु पाळल्याने सर्वांचे आभार प्रशासनाच्या वतीने मानण्यात आले आहेत.

‘ही’ दुकाने अत्यावश्यक सेवांमध्ये खाली दिलेल्या बाबी समाविष्ट असतील

सर्व किराण दुकाने, भाजीपाल्यांचे दुकाने , फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी , सर्व प्रकारची अन्न पदार्थांची दुकाने (चिकन , मटन, कोंबडया, मासे आणि अंडी यांचेसह), कृषी विषयक सेवेसंबंधीत व कृषी अवजारे संबंधीत सर्व दुकाने तसेच शेतमाल,

पाळीव प्राण्यांची पशुखादय दुकाने व येऊ घातलेल्या पावसाळयाशी संबंधीत असलेल्या वैयक्तीक वापरासाठीचा तसेच संस्थात्मक वापरासाठीच्या मालाच्या पुरवठयासंबंधीत असणारी दुकाने सकाळी ०७.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत चालू राहतील .

हॉस्पीटल, डायग्नॉस्टिक सेंटर , क्लिनीक , लसीकरण , वैद्यकीय विमा संबंधी कार्यालये , फार्मसी , फार्मसी कंपन्या आणि इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवेमध्ये समाविष्ट असणारे उत्पादन व वितरण करणारे घटक तसेच त्यासंबधी डिलर्स आणि त्यांची वाहतुक व वितरण तसेच लसी , सॅनिटायझर , मास्क , वैद्यकिय उपकरणे व त्याच्याशी निगडीत सर्व सहायक बाबी , कच्च्या मालाचे उत्पादन घटक आणि त्यासंबधित सेवा यांचा समावेश असेल .

सार्वजनिक वाहतूक : – ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक वाहतूकीच्या बसेस . कृषी निगडीत सेवा आणि कृषी उत्पादन विषयक सर्व सेवा सुरळित सुरु राहण्यासाठी बियाणे , खते , कृषी अवजारे व त्यांची दुरूस्ती त्यांचेशी संलग्नित सर्व उपक्रम चालु राहतील .  सर्व व्यापारी माल ( Commodity ) संबधित आयात – निर्यात  ई – कॉमर्स ( केवळ अत्यावश्यक सेवा व मालाच्या पुरवठयासाठी )

प्रसार माध्यमांचे अधिस्वीकृतीधारक प्रतिनिधी ,  पेट्रोलपंप आणि पेट्रोलिअमशी निगडीत ऑफशोअर , ऑनशोअर उत्पादने .  सर्व प्रकारच्या कार्गो सेवा. डेटा सेंटर / क्लाऊड सेवा/माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत क्रिटीकल इन्फास्ट्रक्चर आणि संबधित सेवा .  शासकिय आणि खाजगी सुरक्षा सेवा  इलेकट्रीक आणि गॅस पुरवठा सेवा .बँक ATM पोष्ट सेवा. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत अत्यावश्यक सेवा म्हणून मान्यता दिलेल्या इतर सेवा.

अत्यावश्यक सेवेत नागरिकांना सेवा पुरविणार्‍या व्यापार्‍यांकडून कोणत्याही प्रकारचे संसर्ग पसरू नये याची दक्षता घेण्याकरिता व्यापारी व दुकानातील कर्मचार्‍यांनी कोरोना चाचणी व लसीकरण करून घेणे बंधनकारक आहे. या चाचण्यांचे रिपोर्टची तपासणी पालिकेकडून करण्यात येईल. तसेच सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची सक्ती सूचनाही दिल्या आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा नगरपालिका

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हृदयद्रावक! शेतीतील नुकसान आणि कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या मंगळवेढ्यातील तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन

November 26, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

किटली आणा, ५ रुपये वाचवा! मंगळवेढ्यातील ‘समर्थ दूध डेअरी’चा पर्यावरणपूरक पॅटर्न चर्चेत

November 25, 2026
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या कुटुंबांना ‘समाधानाची शिदोरी’चा आधार; आमदार आवताडे फाऊंडेशनचा सलगर खुर्द येथे स्तुत्य उपक्रम; अन्नधान्य किट, तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या कुटुंबांना ‘समाधानाची शिदोरी’चा आधार; आमदार आवताडे फाऊंडेशनचा सलगर खुर्द येथे स्तुत्य उपक्रम; अन्नधान्य किट, तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

November 24, 2026
या दिवाळीत करा स्वतःच्या हक्काच्या जागेचे स्वप्न पूर्ण! मंगळवेढ्यात ‘शिवशाही सिटी’ मध्ये बुकिंग सुरू; बुलेट, ई-स्कूटर जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9970766262 संपर्क साधा

भाड्याच्या घरातून व्हा मुक्त! मंगळवेढ्यात घ्या स्वतःचा हक्काचा प्लॉट; मेन डांबरी रोडटच ‘शिवशाही सिटी’मध्ये प्लॉट खरेदी करा; मिळवा १ लाख रुपयांची विशेष सवलत; अधिक माहितीसाठी 9890605962 संपर्क साधा

November 25, 2026
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

ट्रॅक्टरच्या धडकेत सहा वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत; ​मंगळवेढा तालुक्यातील हृदयद्रावक घटना; वाहन उशिरा मिळाल्याने उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली

November 23, 2026
नेत्याप्रती निष्ठेचा नवा आदर्श! आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात ‘शिक्षण अन् स्वच्छतेचा’श्रमदा

नेत्याप्रती निष्ठेचा नवा आदर्श! आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात ‘शिक्षण अन् स्वच्छतेचा’श्रमदा

November 21, 2026
सोलापूर जिल्ह्यातील राजकीय पडझड रोखण्यासाठी समाधान अवताडे यांना संधी देत पालकमंत्री बनविण्याच्या हालचाली सुरू?

पाणीदार आमदारांचा शब्द खरा ठरला! दक्षिण भागाची तहान भागणार; आ.समाधान आवताडेंच्या वाढदिवसादिवशीच म्हैसाळचे पाणी तलावात दाखल

November 21, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

स्वीकृत सदस्य निवडीचा बिगुल वाजला!सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीत वाढणार ‘एवढे’ स्वीकृत सदस्य; पाहा कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा?

November 21, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकरी आणि बेरोजगार तरुणांचे नशीब बदलणारा २६ नोव्हेंबरचा निर्णय; २४ तास आधीच ‘हे’ दोन आयडी तयार ठेवा; आमदार समाधान आवताडे यांनी केले जनतेला आवाहन

November 21, 2026
Next Post
कोरोना रुग्णांसाठी आयुर्वेद संजीवनी!  सोनवणे आयुर्वेद क्लिनिक,पंढरपुर यांनी बनवले अत्यंत उपयोगी औषध.

कोरोना रुग्णांसाठी आयुर्वेद संजीवनी!  सोनवणे आयुर्वेद क्लिनिक,पंढरपुर यांनी बनवले अत्यंत उपयोगी औषध.

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हृदयद्रावक! शेतीतील नुकसान आणि कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या मंगळवेढ्यातील तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन

November 26, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

किटली आणा, ५ रुपये वाचवा! मंगळवेढ्यातील ‘समर्थ दूध डेअरी’चा पर्यावरणपूरक पॅटर्न चर्चेत

November 25, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! आता वर्षातून दोनदा सीईटी; गुण सुधारण्याची मिळाली संधी; पहिली सीईटी अनिवार्य, दुसरी ऐच्छिक; परीक्षांचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर

November 25, 2026
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या कुटुंबांना ‘समाधानाची शिदोरी’चा आधार; आमदार आवताडे फाऊंडेशनचा सलगर खुर्द येथे स्तुत्य उपक्रम; अन्नधान्य किट, तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या कुटुंबांना ‘समाधानाची शिदोरी’चा आधार; आमदार आवताडे फाऊंडेशनचा सलगर खुर्द येथे स्तुत्य उपक्रम; अन्नधान्य किट, तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

November 24, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांनो! तीन वर्ष जमीन कसली नाही तर सरकारकडे जाणार? महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला मोठा खुलासा

November 25, 2026
या दिवाळीत करा स्वतःच्या हक्काच्या जागेचे स्वप्न पूर्ण! मंगळवेढ्यात ‘शिवशाही सिटी’ मध्ये बुकिंग सुरू; बुलेट, ई-स्कूटर जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9970766262 संपर्क साधा

भाड्याच्या घरातून व्हा मुक्त! मंगळवेढ्यात घ्या स्वतःचा हक्काचा प्लॉट; मेन डांबरी रोडटच ‘शिवशाही सिटी’मध्ये प्लॉट खरेदी करा; मिळवा १ लाख रुपयांची विशेष सवलत; अधिक माहितीसाठी 9890605962 संपर्क साधा

November 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..