मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
वडिलांच्या निधनानंतर वृध्द आईचा सांभाळ न करता तिला वाऱ्यावर सोडून वडिलोपार्जित मिळकतीवर डल्ला मारणाऱ्या मुलाला पंढरपूर येथील प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी चांगलाच दणका दिला आहे.
मुलाने आईकडून करून घेतलेले मिळकतीचे हक्कसोडपत्र व फेरफार रद्द करून सर्व मिळकती पूर्ववत आईच्या नावावर करून उलट आईच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा पंधरा हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा आदेश प्रांताधिकाऱ्यांनी दिला आहे.
मंगेश प्रभाकर माळी (रा. कामती खुर्द, ता. मोहोळ) असे आईचा सांभाळ न करणाऱ्या मुलाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथील शोभा प्रभाकर माळी यांना मंगेश व माधुरी अशी दोन मुले आहेत.
यातील मुलगी माधुरी हिचे लग्न झाल्यानंतर ती सासरी गेली. त्यानंतर शोभा या पतीसह मंगेश या एकुलत्या मुलासोबत राहत होत्या. २०१७ मध्ये पती प्रभाकर माळी यांचे निधन झाल्यानंतर शोभा या एकाकी पडल्या. मुलाशिवाय त्यांना दुसरा कोणी आधार नव्हता.
दरम्यान, मुलगा मंगेश याने आईचा सांभाळ करण्याचे खोटे आश्वासन देऊन दिशाभूल करीत शेती व घरजागा अशा सर्व संपत्तीचे हक्कसोडपत्र करून घेऊन सर्व मिळकती स्वतःच्या लहान मुलांच्या नावाने केल्या. त्यानंतर मुलगा मंगेश हा आईचा सांभाळ न
करता तिला उपाशीपोटी ठेवू लागला. अशातच ती एकटी दूरवर शेतात राहायला लागली. तिला मुलाकडून मोठ्या आधाराची गरज असतानाही तो तिला दूर करीत होता.
मुलगा आपल्याला सांभाळत नाही हे लक्षात आल्यानंतर शोभा माळी यांनी आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम अन्वये पंढरपूर येथील प्रांताधिकाऱ्यांकडे दावा दाखल करून मुलगा सांभाळत नसल्याने
मुलाकडून दरमहा पंधरा हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याबरोबरच हक्कसोडपत्र रद्द करण्याची मागणी केली होती. सुनावणीनंतर प्रांताधिकाऱ्यांनी शोभा यांच्या बाजूने निकाल देत सांभाळ न करणाऱ्या मुलाला चांगलाच दणका दिला आहे.(स्रोत:संचार)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज