टीम मंगळवेढा टाइम्स।
मनोज जरांगे पाटील हे गेल्या सहा दिवसापासून मराठा आरक्षणासाठी आमरण अन्नत्याग व जलत्याग उपोषण करत आहेत. महाराष्ट्रातील सर्व आमदार, खासदार, मंत्री फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. सोलापुरातील आमदारांच्या घरासमोर आज शुक्रवारी दुपारी सकल मराठा समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा जनआंदोलन होणार आहे.
शहरातील आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
आमदार, खासदार, मंत्र्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविले आहे.
या अधिवेशनात मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी सर्व आमदारांनी आवाज उठवावा, यासाठी आमदारांच्या दारावर जाऊन त्यांना जागे करण्याचे काम समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने शहर व जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर करण्यात येणार आहे.
राणे यांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन
■ सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी अपशब्द वापरणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेस गवळी वस्ती संघाच्या वतीने मरीआई चौकात जोडेमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी गवळी वस्ती तालीम संघाचे अध्यक्ष महादेव गवळी, चंद्रकांत वानकर, औदुंबर जगताप, बाळासाहेब घुले,
अरुण घुले, चंद्रकांत पवार, शामराव गांगर्डे, अरविंद गवळी, बबलू जगताप, शेखर कवठेकर, सुनील कदम, लहू गायकवाड, विष्णू जगताप, संदीप काशीद, वैभव जगताप, शंकर घुले, संतोष मोरे, लखन कारंडे, उमाकांत निकम, गुंडू भगरे आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात आज शुक्रवारी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उठाव होत असून गावागावात जोडेमारो आंदोलन करण्याचे आवाहन सध्या समाज माध्यमातून केले जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज