मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
व्याजाने रक्कम देऊन त्याबदल्यात भरमसाठ व्याज आकारणी होत असल्याबाबत सांगोला शहरातील पीडित दोघांच्या प्राप्त तक्रारीची दखल घेऊन सहायक निबंधक यांच्या पथकाने सांगोला शहरातील घरावर अचानक धाड टाकली.
खासगी सावकारीसाठी वापरले जाणारे चार रजिस्टर, १८ कोरे चेक, तीन कोरे बॉण्डसह कागदपत्रे जप्त केली तर इतर व्यक्तींच्या घरावर टाकून त्यांचीही चौकशी सुरू आहे.
ही कारवाई शुक्रवार, दि. २१ रोजी दुपारी २ च्या सुमारास सांगोला बसस्थानकाशेजारील गौरव चांडोले, राधा चांडोले यांच्या घरावर केली.
सांगोला येथील गौरव सुनील चांडोले व राधा सुनील चांडोलेसह इतर हे व्याजाने पैसे देऊन त्या
बदल्यात भरमसाठ व्याज आकारणी करतात व पैसे परत न आल्यास चेक बाउन्स करून कोर्टात केस दाखल केल्याबाबत
रोहित बबनराव पाटील व आनंद दत्तात्रय दौंडे (दोघेही रा. सांगोला) यांची सांगोला सहायक निबंधक सहकारी संस्था, सांगोला यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
दोघांच्या तक्रारींची दखल घेऊन सहायक निबंधक प्रकाश नालवार यांच्या पथकाने गौरव चांडोले व राधा चांडोले यांच्या राहय्या घरावर व इतर दोन सावकारांवर अचानक धाड टाकून ही कारवाई केली.
यावेळी पथकाने चांडोले यांच्या घरातून खासगी सावकारी कर्जाबाबत नोंदणी असलेले ४ रजिस्टर, १८ कोरे चेक, ३ कोरे बॉण्ड व उसनवारी करार पत्र इत्यादी कागदपत्रे जप्त केली आहेत. तर, इतर व्यक्तींच्या घरावर गाडी टाकून त्यांचीही कसून चौकशी सुरू आहे.
याबाबत सांगोला पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मदतीने सहायक निबंधक प्रकाश नालवर पथकप्रमुख एस. एस. सांगोलकर, डी. पी. सुरवसे, व्ही. जे. वडतिले यांच्या पथकाने केली आहे.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज