मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा सबजेलमध्ये असलेल्या कैद्यांना बेकायदेशीररीत्या भेटून मोबाइलवरून त्यांच्या वडिलांसोबत बोलणे करून देण्यासाठी प्रयत्न केल्याप्रकरणी
आदित्य अरुण सोनवले (वय २२, रा. बेगमपूर) व समर्थ राजाराम मोरे (रा. इंचगाव) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकिकत अशी, जुन्या सबजेलचे दुरुस्ती कामकाज सुरू असल्याने तेथील सर्व कैदी नवीन तहसील कार्यालय सबजेलमध्ये ठेवण्यात आले आहेत.
यातील फिर्यादी तथा सबजेलर सीताराम रायाप्पा कोळी हे दि. २० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता कर्तव्यावर असताना गार्ड अंमलदार पोलिस हवालदार जाधव यांनी
कारागृहाच्या पाठीमागील खिडकीतून कैद्यांना दोघेजण काहीतरी वस्तू पुरवत असल्याबाबत लेखी रिपोर्ट देऊन त्यांनी फिर्यादीस सांगितले.
तद्नंतर सबजेल इमारतीच्या पाठीमागे तपासणीसाठी सदरचे जेलर गेल्यावर सबजेलच्या इमारतीवर आरोपी कोठडीच्या खिडकीजवळ दोघे आरोपी चढून खिडकीतून आतमध्ये हात घालून आतील
कैद्यांना वस्तू पुरवत असल्याचा संशय आल्याने गार्डवरील पोलिस शिपाई हत्ताळी व इतरांनी मिळून त्यांना जागीच रंगेहाथ पकडले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज