मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील मरवडे व गोणेवाडी येथे पोलिसांनी जुगार अड्डयावर छापे टाकून ६ लाख ६८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत २२ जणावर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मरवडे येथील स्मशानभूमी भिंतीच्या आडोशाला गोलाकार बसून ५२ पत्त्यांच्या पानावर पैशाची पैज लावून मन्ना नावाचा जुगार खेळताना पोलिसांनी छापा टाकून २ लाख ७३ हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून
समाधान पाटील, शिवाजी मासाळ, गुलाब इनामदार, भारत पाटील, सुरेश टोमके, सुभाष शिवशरण, शहाजान मुजावर, उस्मान मणेरी, विजय सोनवणे, लक्ष्मण पवार आदी दहा जणाविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दि. २१ रोजी ४ वाजता स्मशानभूमी भिंतीच्या आडोशाला काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना मिळताच सदर ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता वरील दहा आरोपी गोलाकार बसून ५२ पानाच्या पत्त्यांवर पैशाची पैज लावून मन्ना नावाचा जुगार खेळत असताना मिळून आले.
पोलिसांनी रोख रक्कम, ५ मोबाईल, ६ मोटारसायकल असा एकूण २ लाख ७३ हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याची फिर्याद पोलीस शिपाई मळसिध्द कोळी यांनी दिल्यावर वरील दहा जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या छाप्यात गोणेवाडी शिवारात लिंबाच्या झाडाखाली बसून ५२ पानाच्या पत्त्यांवर पैशाची पैज लावून मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून ३ लाख ९५ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून
लक्ष्मण पाटील, समाधान गरंडे, रामचंद्र हजारे, सतीश थोरात, किसन पाटील, शहाजी साळुंखे, सिद्धू गुंगे, नवाज तांबोळी, नवनाथ कोळी, संतोष साखरे, गणपत मासाळ, भारत मंडलिक आदी बारा जणाविरूध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोणेवाडी येथील शेतकरी सुखदेव काळे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली वरील बारा आरोपी गोलाकार बसून ५२ पत्त्यांच्या पानावर पैशाची पैज लावून मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधिकाऱ्यास मिळताच दि. २३ रोजी ३.१५ वाजता पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम,
६ मोटारसायकल असा एकूण ३ लाख ९५ हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याची फिर्याद पोलीस शिपाई अजयसिंह शिंदे यांनी दिल्यावर वरील बारा जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज