मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील खडकी येथे शेतातील एका पत्राशेडच्या आडोशाला ५२ पत्त्याच्या पानावर पैशाची पैज लावून मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून २ लाख ४ हजार ५७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन
किसन राठोड (वय ५२), श्रीमंत कांबळे (वय ६०), रामलिंग जाधव (वय ३७), शंकर मरीआईवाले (सर्व रा.खडकी), विश्वास कांबळे (वय ५७, रा. नंदेश्वर ) या पाच जणाविरुध्द महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची हकीकत अशी, खडकी परिसरात पोलीस गस्त घालत असताना श्रीमंत कांबळे याच्या शेतातील पत्रा शेडच्या आडोशाला वरील आरोपी गोलाकार बसून ५२ पत्त्याच्या पानावर पैशाची पैज लावून मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी नयोमी साटम यांना मिळताच
त्यांनी पोलिसांच्या मदतीने दि. २६ रोजी दुपारी १.४० छापा टाकला असता यामध्ये २ हजार ६७० रुपये रोख, बॉलपेन, ५२ पानी पत्त्याचा डाव, ७० हजार रुपये किमतीची शाईन गाडी, ४५ हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची गाडी,
३५ हजार रुपये किमतीची प्लाटिना गाडी, ३० हजार रुपये किमतीची हिरोहोंडा गाडी, ३० हजार रुपये किमतीची हिरोहोंडा गाडी अशा ५ मोटारसायकल तसेच ३० हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे ४ मोबाईल
असा एकूण २ लाख ४ हजार ५७० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याची फिर्याद पोलीस शिपाई अजयसिंह शिंदे यांनी दिल्यावर वरील आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज