टीम मंगळवेढा टाईम्स । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या करुन स्वत:चं जीवन संपवलं. सुशांतने वांद्र्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागील कारण सध्या अस्पष्ट आहे. दरम्यान, सुशांतच्या आत्महत्या केल्याची माहिती मिळताच मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ( Sushant Singh Rajput suicide) अवघ्या काही काही दिवसांपूर्वी त्याच्या मॅनेजरने आत्महत्या केली होती.
सुशात सिंह राजपूतने आतापर्यंत अनेक टीव्ही सिरिअल आणि चित्रपटात काम केले आहे. सुशांतच्या करिअरची सुरुवात टीव्ही सिरिअल ‘किस देश मे हा मेरा दिल’ मधून झाली. यानंतर त्याला खरी लोकप्रियता दिग्दर्शक एकता कपूर यांची सिरिअल ‘पवित्र रिश्ता’मधून मिळाली. यानंतर सुशांतने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली.
Actor #SushantSinghRajput commits suicide
For more detail visit: https://t.co/moM5R57aJv pic.twitter.com/lZXIdeSl6W
— India TV (@indiatvnews) June 14, 2020
टीव्ही सिरिअल ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील सहअभिनेत्री अंकिता लोखंडे सोबत सुशांतची जोडी अत्यंत लोकप्रिय ठरली होती. सुशांत आणि अंकिता काही वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. दोन वर्षांपूर्वी दोघं विभक्त झाले होते.
‘काय पो छे’ या चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याने प्रमूख भूमिका निभावली. या चित्रपटातील त्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केलं होतं. त्यानंतर ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटात वाणी कपूर आणि परिणीती चोप्राोसबत त्याने काम केलं . यानंतर ‘केदारनाथ’, ‘पीके’ सारख्या सुपरहिट चित्रपटातही त्याने काम केलं.
सुशात सिंह राजपूतने आतापर्यंत टीव्ही सिरिअल आणि चित्रपटात काम केले आहे. सुशांतच्या करिअरची सुरुवात टीव्ही सिरिअल किस देश मे हा मेरा दिल मधून झाली आहे. यानंतर खरी ओळख त्याला दिग्दर्शक एकता कपूर यांची सिरिअल पवित्र रिश्तामधून मिळाली. यानंतर सुशांतने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली.
काय पो छे या चित्रपटातू सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याने प्रमूख भूमिका निभावली होती. त्यासोबत त्याच्या अभिनयाचेही सर्वांनी कौतुक केले होते. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स चित्रपटात वाणी कपूर आणि परिणीती चोप्राोसबत त्याने काम केले होते. यानंतर केदारनाथ, पीके सारख्या हिट चित्रपटातही त्याने काम केले आहे. सुशांत सिंहचा जन्म बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील महीदा येथे झाला.
Pavitra Rishta fame actor Sushant Singh Rajput commits suicide
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज