टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. १७ एप्रिल रोजी मतदान तर २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.त्यामुळे सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
या मतदारसंघात तपासणीसाठी २० पथकांची नियुक्ती केली आहे.आचारसंहितेचा भंग झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रचार सभा, रॅली यावर बंदी आहे. पण परवानगी देण्यासाठी निवडणूक आयोगास पत्र पाठवून विचारणा करण्यात येणार आहे.
आयोगाने परवानगी दिल्यास नियमानुसार सभा घेण्यास परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
मतदारसंघात एकूण ३ लाख ३९ हजार ५४० मतदार आहेत. यामध्ये १ लाख ७७ हजार ३८७ पुरुष तर १ लाख ६२ हजार १४८ महिला मतदार आहेत. १८ ते १९ वयोगटातील ५६००, ,२० ते २९ वयोगटातील ६९ हजार ३०२ तर ३० ते ३९ वयोगटातील ७६ हजार १३२ व ८० वर्षापेक्षा अधिक वयोगटातील १३ हजार ६८८ मतदारांचा समावेश आहे.
मतदारसंघात एकूण मतदान केंद्रे आहेत. कोरोनामुळे एका मतदान केंद्रावर १ हजार मतदार संख्या निश्चित केल्याने १९६ मतदान केंद्रांची वाढ झाली आहे.
एकूण मतदान केंद्रांची संख्या ५२४ वर पोहोचली आहे. बॅलेट युनिट १ हजार ५०, कंट्रोल युनिट १ हजार १६ तर व्हीव्हीपॅट १ हजार ९ इतके लागणार आहेत. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ३ हजार ९ ६५ कर्मचारी नियुक्त केले आहेत.
यामध्ये मतदान केंद्रावर ३१५० झोन अधिकारी ६० पोलिस कर्मचारी ५५० यांचा समावेश आहे.
५ हजार मास्क , ४५०० फेस शिल्ड …
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मास्क , सॅनिटायझर, थर्मल गन, फेस शिल्ड , हॅन्डग्लोज साहित्यही देण्यात आले आहे. प्रत्येक मतदारांचे तापमान तपासणीसाठी १२१० आशा वर्करची नियुक्ती करण्यात आली आहे. ५५० थर्मल गन , ४५०० फेस शिल्ड , ४५०० हॅन्ड ग्लोज तर ५ हजार मास्क पुरविण्यात येणार आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज