टीम मंगळवेढा टाईम्स।
मतमोजणीनंतर अतिउत्साही शेकाप कार्यकर्त्यांनी हातात वाघसदृश खेळणे धरून त्याच्या पार्श्वभागात लाकडी काठी घालून पराभूत उमेदवार शहाजीबापू पाटील व दीपक साळुंखे
यांच्याबद्दल हात इशारे करत अश्लील वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. हा प्रकार शनिवार, २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता घडला होता.
याबाबत, शांताराम श्रीमंत यादव (रा.गार्डी, ता. पंढरपूर) यांनी फिर्याद दिली असून याप्रकरणी सचिन उर्फ अशोक प्रभू शिंदे, नवनाथ बाबुराव सरगर (दोघेही रा.पळशी, ता.पंढरपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी विधानसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली होती. निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांचा पराभव झाल्यानंतर सायंकाळी ५:३० च्या सुमारास
भाळवणी गटातील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शिंदेसेनेचे नेते शहाजीबापू पाटील व दीपक साळुंखे यांच्याबद्दल आरोपींनी रस्त्यावर उभे राहून हातामध्ये वाघसदृश खेळणे हातात धरून
त्याच्या पार्श्वभागात लाकडी काठी घालून दीपकआबा आमच्या नादी लागू नको, नाहीतर तुझ्यात लाकूड घालीन अशी अर्वाच्य भाषा वापरली.
शहाजीबापू पाटील यांच्या बाबतीत तशाच प्रकारे आक्षेपार्ह वक्तव्य करत अश्लील हात इशारे करून तिथून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज