टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर येथे सालाबाद प्रमाणे कै.रामगोंडा बापूराव चौगुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त याही वर्षी सिद्धापूर फेस्टिवल दि.7 जानेवारी ते 13 जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रमाने आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष गजानन पाटील सर यांनी दिली आहे.
शनिवार दि.7 जानेवारी रोजी सकाळी कै. रामगोंडा बापूराया चौगुले यांच्या प्रतिमेचे पूजन सोसायटीचे माजी चेअरमन तिप्पाणा सिंदखेड यांच्या शुभहस्ते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमगोंडा पाटील उपस्थित राहणार आहेत,
सकाळी 10 वाजता सिद्धापूर फेस्टिवलचे उद्घाटन सरपंच रसूल मुलानी यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे, यावेळी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष ओग्याप्पा मलकारी, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटक म्हणून माजी उपसरपंच गंगाधर काकणकी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तांडोर गावचे विद्यमान सरपंच सिद्धेश्वर मळगे यांची उपस्थिती लाभणार आहे,
शनिवार दि.7 रोजी सकाळी 11 वाजता स्लो मोटरसायकल स्पर्धा संपन्न होणार आहे, या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून दामाजी कारखान्याचे संचालक दयानंद सोनगे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी चेअरमन सुधाकर पाटील यांची उपस्थिती असणार आहे.
रविवार दि.8 रोजी सकाळी ग्रंथदिंडी व वाचन प्रेरणा प्रभात फेरी होणार असून यावेळी उद्घाटक म्हणून प्रगतशील बागायतदार राजकुमार तळे तर अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन कुंभार उपस्थित राहणार आहेत.
मंगळवेढ्यात दहा हजारांच्या खरेदीवर 5 हजारांची खरेदी मोफत; अनामिका क्लॉथ सेंटरमध्ये धमाका सेल
दुपारी 12 वाजता आनंदी बाजार साजरा होत असून, या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानासो मलगोंडे तर अध्यक्ष म्हणून आप्पासाहेब चौगुले उपस्थित राहणार आहेत.
दुपारी रांगोळी स्पर्धा, जनरल नॉलेज स्पर्धा होणार आहेत. सोमवार दि.9 जानेवारी रोजी विद्यार्थी शिक्षक दिन पार पडणार आहे.
मंगळवार दि.10 जानेवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रम पार पडणार असून यावेळी उद्घाटक म्हणून ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन बापूराया चौगुले उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवार दि.13 रोजी सायंकाळी सहा वाजता वार्षिक स्नेहसंमेलन व विविध पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडेल, याप्रसंगी उद्घाटक म्हणून तालुक्याचे जनतेचे आमदार समाधान आवताडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे युवा नेते प्रणव परिचारक, मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप खांडेकर यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी, विविध पक्षाचे पदाधिकारी, मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल प्रोत्साहन पर पुरस्कार रूपाने पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे, साहित्य क्षेत्रातील शब्दांकुर पुरस्कार म्हणून सुनील जंवजाळ, कृषी क्षेत्रातील प्रगतशील शेती बाबत उघडेवाडी तालुका माळशिरस येथील शेतकरी बळीवंश पुरस्कार म्हणून बाबुराव यशवंत सादी
तसेच शिक्षण क्षेत्रातून अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून प्रशांत नागुरे,स्वच्छ शाळा सुंदर शाळा ज्ञानगण पुरस्कार म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्याचे दर्गनळी येथील आदर्शवत प्रशाला म्हणून लक्कम्मादेवी प्रशाला,
मंगळवेढा तालुक्यातून पत्रकार क्षेत्रातून जनमित्र पुरस्कार म्हणून ज्ञानेश्वर भगरे, सामाजिक क्षेत्रातील आदर्शवत कार्य म्हणून मरवडे येथील राज्यभर प्रसिद्ध असलेल्या छत्रपती परिवाराचा सन्मान,राजकीय क्षेत्रात राजकीय चेहरा म्हणून संजय तेली, शैक्षणिक क्षेत्रातून आदर्श पालक तांडोर गावतील माता श्रीमती कमलाबाई भोसले,
पशु वैद्यकीय सेवेतून आदर्शवत कार्य असलेले पशुसेवा पुरस्काराचे मानकरी डॉक्टर ब्रह्मानंद कदम यांचा पुरस्कार रूपाने सन्मान सोहळा पार पडणार आहे,
याप्रसंगी तालुक्यातील सर्व क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सिद्धापूर फेस्टिवल माध्यमातून समाज प्रबोधन व सामाजिक कार्यासाठी सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आव्हान आरबीसी परिवाराचे मार्गदर्शक बापूराव चौगुले व गजानन पाटील सर यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज