टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यभरात ठिकठिकाणी ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त होत असतानाच माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी चक्क मतदान चाचणी घेण्याचा निर्णय घेत त्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे.
विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये गावात सर्वाधिक मतदान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला झाल्याचा दावा करीत, विरोधी भाजपा भाजपा उमेदवाराला ज्यादा मते पडली कशी असा सवाल करीत, फेरमतदानाची मागणी मारकडवाडी ग्रामस्थांनी केली आहे.
गावचे यापूर्वीचे ही मतदान २००९, २०१४, २०१९ व पाच महिन्यांपूर्वीची २०२४ लोकसभा या निवडणुकीतील गावचे मतदान ज्या बाजूने कल असेल त्या उमेदवाराला पडलेले होते. मात्र अचानक यावेळी विरोध असताना सुद्धा विरोधी उमेदवाराचे मताधिक्य वाढले आहे,
त्यामुळे गावकऱ्यांनी खात्री करण्यासाठी चाचणी मतदान मंगळवार दि. ३ डिसेंबर रोजी करण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी सरकारी कर्मचारी मिळावा याबाबतचे शुल्क भरण्याची तयारीही गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मारकडवाडी गावात नेहमीच उत्तमराव जानकर यांना मोठे मताधिक्य मिळत आले. विधानसभा निवडणुकीत प्रथमच विरोधी उमेदवाराला १६० मताधिक्य मिळाल्याने मतदारांमध्ये संभ्रम आहे. तो दूर करण्यासाठी स्वखर्चाने बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याची गावकऱ्यांची तयारी आहे.
त्यासाठी शासकीय कर्मचारी पुरवावेत, अशा मागणीचे पत्र शुक्रवारी तहसीलदारांना देण्यात आले. दरम्यान निवडणुकीत कोणताही घोटाळा नाही. चाचणी मतदानाची कसलीही तरतूद नसल्याचे तहसीलदार सुरेश शेजूळ यांनी माध्यमांना कळवले आहे.
मारकडवाडी (ता. माळशिरस) येथील ग्रामस्थांनी माळशिरस तहसीलदारांना दिलेल्या लेखी निवेदनात गेल्या तीन निवडणुकीत ८० टक्के मतदान उत्तमराव जानकर किंवा ते सांगतील त्याच उमेदवाराला मिळालेले होते.
आता विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा झाला असून याची खात्री करण्यासाठी आम्ही चाचणी मतदान घेणार आहोत. त्यासाठी आपली शासकीय यंत्रणा मिळावी. आम्ही गावकरी शुल्क भरण्यास तयार आहोत. मंगळवार, ३ डिसेंबर रोजी चाचणी मतदान घेण्यास तयार असल्याचे निवेदनात नमूद आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज