टीम मंगळवेढा टाइम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे झाडाचे फांदे घरासमोर टाकल्याच्या कारणावरून रमेश लोखंडे यास शिवीगाळ व दमदाटी करून डोक्यात दगड मारून जखमी केल्याप्रकरणी
बाबासाहेब आबासाहेब धनवे व मंदाकिनी आबासाहेब धनवे या पती पत्नीविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी रमेश गजानन लोखंडे दि.25 रोजी सकाळी 7.00 वा. घरी असताना आरोपीनी त्यांचे शेतातील बोराचे झाडाची फांदी तोडून फिर्यादीच्या घरासमोरील शेताच्या बांधावर आणून टाकले होते.
यावेळी फिर्यादी आरोपीना झाडाची फांदी आमच्या घरासमोर का टाकता असे विचारले असता आरोपीनी माझे शेतात टाकले आहे.
तुला काय त्रास? असे म्हणून शिवीगाळी दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत दगड घेवून फिर्यादीच्या डोक्याच्या डाव्या व उजव्या बाजूस
मारून गंभीर जखमी केले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस हवालदार महेश कोळी हे करीत आहेत.
बांधावर फांदी टाकल्याच्या कारणावरून डोक्यात घातले दाताळ; या प्रकरणी तीघांविरूध्द गुन्हा दाखल
बोराळे येथे शेताच्या बांधावर बोराच्या झाडाची फांदी टाकल्याच्या कारणावरून बाबासाहेब धनवे यास लोखंडी दाताळाने व दगडाने डोक्यात मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी रमेश गजानन लोखंडे,आण्णाप्पा गजानन लोखंडे,रतन गजानन लोखंडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी बाबासाहेब धनवे यांच्या शेताच्या शेजारी महादेवी रामचंद्र कोरे यांची शेती असून सदरची शेती त्यांचे नातेवाईक रमेश लोखंडे हे करतात.
फिर्यादी व रमेश लोखंडे यांच्यामध्ये बांधाच्या कारणावरून किरकोळ स्वरूपात यापुर्वी वाद झाले होते.
दि.25 रोजी शेताच्या बांधावर फट असल्याने त्यामधून भटके कुत्रे घरासमोर येवून त्रास देत असल्याने सकाळी 8.00 वा.बोराच्या झाडाची फांदी तोडून बांधावर टाकली होती.
तदनंतर वरील आरोपीनी येवून तु आमच्या शेताच्या बांधावर झाडाची फांदी का टाकली असे म्हणून शिवीगाळी,दमदाटी करू लागले.त्यावेळी फिर्यादी बांधाच्या अलिकडे फांदी लावल्याचे समजावून सांगत असताना
वरील आरोपीने घरासमोर पडलेले लोखंडी दाताळाने फिर्यादीच्या उजव्या बाजूच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याचा अधिक तपास पोलिस हवालदार महेश कोळी हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज