mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी अपडेट! बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा टेम्पो पलटी होऊन एक ठार; आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 28, 2024
in क्राईम, मंगळवेढा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

बेकायदा वाळू वाहतूक करणारा टेम्पो पोलीसांना पाहताच चालकाने वेगाने पळाल्याने त्यामध्ये वाहन पलटी होवून एकाचा मृत्यू तर अन्य एक जखमी झाल्याची घटना घडली असून

या प्रकरणी वाहन चालक सुरज शहाजी चव्हाण (रा.सांगोला),गणेश दत्तत्राय मस्के,गणेश भाऊसाहेब मस्के,देवल शक्तीमान उघडे (रा.शिरगाव ता.पंढरपूर),वाहन मालक चैतन्य सुभाष गायकवाड (रा.ओझेवाडी) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यात भारतीय न्याय संहिता कलम 105 हे कलम वाढ करण्यात आली असून वाहन चालक सुरज शहाजी चव्हाण यांच्या विरोधात सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी पोलीस नाईक ईश्वर दुधाळ व पोलीस हवालदार श्रीमंत पवार,पोलीस अंमलदार कदम हे दि.22 रोजी 4 वाजता पेट्रोलिंग करीत उचेठाण परिसरात आले असता त्यांना मुढवी येथून एक अवैध वाळू वाहतुक करणारे वाहन आले होते.

यावेळी कारखाना चौकात पोलीस थांबले असता त्यांना पाहून पांढर्‍या रंगाचे चार चाकी एन्ट्रा वाहन येत असल्याचे पोलीसांना वाळू वाहतूकीचा संशय आल्याने वाहन थांबविण्याचा इशारा केला,

मात्र ते वाहन पुढे तसेच उचेठाण गावच्या दिशेने जात असताना गडदे वस्ती येथे चालकाचा वाहनावरील ताबा सुटून ते पलटी झाले. पोलीसांनी सदर घटने ठिकाणी पाहणी केल्यावर तीन इसम जखमी अवस्थेत रोडवर पडले होते त्यांचे डोकीस,पायास,हातास जखमा झाल्या होत्या.

सदर इसमांची चौकशी केली असता वाहन चालक सुरज चव्हाण व हौद्यात पाठीमागे बसलेले गणेश दत्तात्रय मस्के,गणेश भाऊसाहेब मस्के,देवल शक्तीमान उघडे,वाहन मालक चैतन्य सुभाष गायकवाड असे असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

पोलीसांनी 2 लाखाचा एन्ट्रा चार चाकी वाहन,2 हजार किंमतीची अर्धा ब्रास वाळू असा एकूण 2 लाख 2 हजार रुपयाचा मुद्देमाल केला आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षण अंकुश वाघमोडे हे करीत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: गुन्हा दाखल

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ॲट्रॉसिटी प्रकरणातून आरोपीची जामीनावर मुक्तता; मंगळवेढ्यातील ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तीवाद ग्राह्य; न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

December 7, 2025
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

धक्कादायक! मोठ्या भावाच्या लग्नाला निघालेल्या मंगळवेढ्यातील तरुणाचा भीषण अपघात; कंटेनर-दुचाकीच्या धडकेत जागीच मृत्यू

December 5, 2025
भाजपचा नगराध्यक्ष, उमेदवार नगरपालिकेत पाठवा, मंगळवेढा शहराच्या विकासासाठी मागेल तेवढा निधी भाजप सरकारकडून आणणार; आमदार समाधान आवताडे यांनी दिला जनतेला शब्द

भाजपचा नगराध्यक्ष, उमेदवार नगरपालिकेत पाठवा, मंगळवेढा शहराच्या विकासासाठी मागेल तेवढा निधी भाजप सरकारकडून आणणार; आमदार समाधान आवताडे यांनी दिला जनतेला शब्द

December 3, 2025
शेतकऱ्यांचा संयम सुटला! भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांनाच कोंडले; कामे होत नसल्याचा व्यक्त केला संताप; प्रचार बाजूला सोडून हेंबाडे आले मदतीला

शेतकऱ्यांचा संयम सुटला! भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांनाच कोंडले; कामे होत नसल्याचा व्यक्त केला संताप; प्रचार बाजूला सोडून हेंबाडे आले मदतीला

December 2, 2025
राज्यातील पहिला असा अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या गेल्या १५ वर्षात १५ बदल्या

मंगळवेढा बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकामार्फत चौकशी करा; व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

December 1, 2025
मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

राज्यस्तरीय सेपक टकरा स्पर्धेत मंगळवेढ्याला दुहेरी मुकुट; इंग्लिश स्कूल खेळाडूंच्या नेतृत्वाखाली चमकदार कामगिरी; भल्या मोठ्या संघाचा पराभव करत मिळविले विजेतेपद

December 1, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

गोंधळ थोडा शमला असला तरी राजकीय वातावरणाला नव्या अनिश्चिततेची धार; वाढीव प्रचार काळाचा आर्थिक ताण परिणाम उमेदवारांवर; तापलेले राजकारण थरारमय राहणार

December 2, 2025
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

ज्या टप्प्यावर आता प्रक्रिया थांबली होती, तिथून पुढच्या टप्प्याची निवडणूक प्रकिया राबवली जाणार; मंगळवेढा नगरपालिकेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नव्याने नाही

November 30, 2025
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिका निवडणूक नव्याने जाहीर; असा आहे सुधारित वेळापत्रक; उमेदवारांची धाकधूक वाढली

November 30, 2025
Next Post
उमेदवारांना ज्या दिवशी मैदानी चाचणीसाठी बोलावले, त्याच दिवशी हजेरी अनिवार्य; गैरहजरांना पुन्हा मैदानी चाचणीसाठी संधी नाही

तरुणांनो तयारीला लागा! होमगार्ड भरतीसाठी नोंदणी सुरू, होमगार्ड सदस्यत्त्वाचे भरपूर फायदे; आजच करा अर्ज

ताज्या बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ॲट्रॉसिटी प्रकरणातून आरोपीची जामीनावर मुक्तता; मंगळवेढ्यातील ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तीवाद ग्राह्य; न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

December 7, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

भयंकर! प्रसुतीवेळी चुकीच्या गटाचा रक्तपुरवठा झाल्याने महिलेचा मृत्यू; दोन्ही रक्तातील विसंगती न तपासल्यामुळे घडला प्रकार

December 6, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सर्व अंदाज फेल! नगपरिषद अन् नगरपंचायतीच्या निकालावर सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय आला

December 6, 2025

जिल्हा परिषद, महापालिकांचा बिगुल वाजण्याआधी ‘या’ निवडणुका पुढे ढकलल्या; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

December 6, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! तत्काळ मदतीकरिता कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा; आता तातडीने आर्थिक मदत मिळणार

December 6, 2025
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

धक्कादायक! मोठ्या भावाच्या लग्नाला निघालेल्या मंगळवेढ्यातील तरुणाचा भीषण अपघात; कंटेनर-दुचाकीच्या धडकेत जागीच मृत्यू

December 5, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा