mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

श्री.विठ्ठल-रुक्मिणीचा आज शाही विवाह; पंढरपुरात लगीनघाई, फुलांचा महाल, विठ्ठल-रुक्मिणीला खास पोशाख

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 5, 2022
in सोलापूर
पंढरपूर ब्रेकिंग! कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन तीन दिवस बंद राहणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

प्रतिवर्षाप्रमाणे वसंत पंचमीला श्री विठ्ठल-रुक्मिणी चा विवाह मंदिरातील विठ्ठल सभामंडपात मोठ्या थाटात पार पाडला जातो. त्यानुसार आज शनिवारी दुपारी 12 वाजता हा शाही विवाह पार पाडण्यासाठी मंदिर समितीने जय्यत तयारी सुरू केली आहे.

सभामंडपात लग्नमंडप उभारला जात आहे. फुलांची आरास करण्यात येत असून वाजंत्री शोभा वाढवणार आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी चा शाही विवाह सोहळा दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी मंदिर समिती प्रयत्न करीत आहे.

आज दुपारी 12 वाजता अक्षता पडणार आहेत. या अनुषंगाने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे,

तर मंदिर, विठ्ठल सभामंडप, सोळखांबी येथे नयनरम्य फुलांची सजावट करण्यात येत आहे. फुलांची सजावट ‘श्रीं’च्या गाभार्‍यातही करण्यात येत आहे.

आकर्षक फुलांच्या सजावटीमूळे मंदिरात नेत्रसुखद , मंगलमय वातावरण तयार करण्यात येते. वसंत पंचमी दिवशी सकाळपासूनच शाही विवाह सोहळ्याची तयारी म्हणून विठ्ठल सभामंडप येथे लग्न सभामंडप उभारण्यात येतो.

विठ्ठलाला पांढराशुभ्र रेशमी पोषाख

या मंडपाला विविध रंगांच्या आकर्षक फुलांनी सजवण्यात येते. मंडपही लावण्यात येतो. जसजसा लग्न मंडपात येण्याअगोदर विठ्ठलाला पांढराशुभ्र रेशमी पोषाख,

रूक्मिणी मातेच्या मूर्तीला रेशमी साडी परिधान

तर रूक्मिणी मातेच्या मूर्तीला रेशमी साडी परिधान करण्यात येते. सोन्याचे दागिने परिधान करण्यात येतात. त्यामुळे देवांचे रुप अधिकच खूलून दिसते.

लग्नसोहळ्यानमित्त लग्नमंडपात वाजंत्री आपल्या वाद्यांनी मंगलमय वातावरण निर्माण करतात. तर अंतरपाट धरुन भटजी मंगलाष्टका म्हणतात. मंगळाष्टकांवेळी अक्षता टाकून वर्‍हाडी मंडळी लग्न सोहळ्याचा आनंद व्दिगुणित करतात.

मंगलाष्टका होताच आलेल्या वर्‍हाडी मंडळींना मंदिर समितीच्यावतीने खास भोजनाची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. एकंदरीत आज होणार्‍या विठ्ठल-रूक्मिणीच्या शाही विवाहाची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे.

दरम्यान, गतवर्षी कोरोना महामारीमुळे श्री विठ्ठल-रूक्मिणीचा शाही विवाह सोहळा मर्यादित स्वरुपात साजरा करण्यात आला होता.

याही वर्षी कोरोना प्रादुभावामुळे श्री विठ्ठल-रूक्मिणीचा विवाह मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. यामुळे भाविक भक्तांतून नाराजी व्यक्त होत आहे.

असे असले तरी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून श्री विठ्ठल-रूक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्याचे थेट प्रेक्षपण ठेवण्यात येणार आहे.

वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर होणारा श्री विठ्ठल-रूक्मिणीचा शाही विवाह सोहळा भाविकांना घरबसल्या पाहता येणार आहे. दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणारा विवाह सोहळा मात्र दोन वर्षांपासून मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात येत आहे.

मागील वर्षी करण्यात आलेल्या तयारीच्या तुलनेत आज होणारा लग्नसोहळा अधिक उत्तमपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

लग्नसोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी मंदिर समिती प्रयत्नशील

श्रींच्या पोशाखाची तयारी, सभामंडपाची सजावट, फुलांची आकर्षक साजवट, जेवणाची व्यवस्था, याबाबत तयारी करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेत लग्नसोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी मंदिर समिती प्रयत्नशील आहे. – बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पंढरपूरविठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा

संबंधित बातम्या

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! सोलापूर जिल्ह्यात कधी पडणार चांगला पाऊस? पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

August 23, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

August 19, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! इन्स्टाग्रामवर ओळख झाली अन्… मंगळवेढ्यातील महिलेची मोठी फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल

August 18, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

मोठी बातमी! ​सात वर्षांखालील शिक्षेच्या गुन्ह्यात आधी नोटीस बंधनकारक; कोल्हापूर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

August 19, 2026
कत्तलखान्याकडे जाणारी ३१ जनावरे पकडली; मंगळवेढ्यातील दोघांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! फक्त ‘एवढ्या’ टक्के हप्त्यात जनावरांना मिळणार विमा संरक्षण; पशुधन दगावल्यास मिळणार भरपाई; आजच अर्ज करा

August 20, 2026
मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
Next Post
शेतकऱ्यांनी लक्ष द्या! वारसनोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

खळबळ! मंगळवेढा तालुक्यातील 'या' गावातील जवळपास दीड हजार एकर जमिनीच्या खरेदी-विक्रीला ब्रेक; काय आहे प्रकरण,वाचा सविस्तर

ताज्या बातम्या

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

August 24, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध; महाराष्ट्र सरकार लावणार शिस्त; दिवसाला ५ तासांची मर्यादा; ‘इतक्या’ वर्षांखालील मुलांना प्रवेश मनाई, शुल्कवाढीलाही लगाम

August 24, 2026

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतीत जाऊनही ग्रामसेवक भेटत नाही? राज्य सरकारने गुपचूप घेतला ‘हा’ मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा